– संविधानदिनानिमित्त मनपाच्या कर्मचाऱ्यांना संविधान उद्देशिकेचे वाटप
नागपूर :- संविधान दिनानिमित्त महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज (ता.26) महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. तसेच आयुक्तांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना उद्देशिकेचे वाटप करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, मुख्य अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त मेघना वासनकर, उपायुक्त राजेश भगत, उपायुक्त गणेश राठोड, नगर रचना उपसंचालक गिरीश गोडबोले, विधी अधिकारी प्रकाश बरडे, सहायक विधी अधिकारी सुरज पारोचे, मुख्य लेखापरीक्षक किरण तायडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, क्रीडा अधिकारी पियूष आंबुलकर व प्रमोद हिवसे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

प्रारंभी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर आयुक्तांनी राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त मेघना वासनकर यांच्या हस्ते उद्देशिकेचे वितरण मनपाचे कर्मचारी मनीष डुमरे, कैलास लांडे, प्रकाश खानझोडे, अनिल राठोड, देवानंद शामकुळे, किरण देशमुख, नीलिमा जनबंधू व अजय माटे यांना करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले.








