नागपूर :- धनगवळी नगरातील नागरिकांच्या घरासमोर लटकत असलेली उघडी विद्युत तारे काढून केबल टाकण्याचे काम विशाल कोरके यांच्या मागणीवरून सुरू तसेच इंद्रनगर ते आनंद मिलेनियम टावर पर्यंत MSEB चे नवीन उंच 34 विद्युत खांब लागणार प्रभाग 29 न्यू नरसाळा रोड या भागात सिमेंट रोडच्या उंचीमुळे विद्युत खांबांची उंची 4 ते 5 फुटाणे कमी झाली असल्याने विद्युत तारे अतिशय खाली लोंबत असून काही भागात 8 ते 10 फुटांवर, तर काही भागात हात उंचा केला तरीही ताराला स्पर्श करू शकतो तसेच या रोडवर असलेल्या दुकाना समोरील लोखंडी शेडला सुद्धा विद्युत तारे स्पर्श करत असल्याने शिवसेना विधानसभा संघटक विशाल कोरके यांच्या तर्फे सतत पाठवता करून इंद्र नगर ते आनंद मिलिनियम टावर पर्यंत 34 उंच विद्युत खांब लावण्याची मागणीला यश आले आहे काही दिवसांतच विद्युत खांब बदलण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. समस्येचे निवारण होत असल्याने नागरिकांनी मोकळा श्वास घेतला असून शिवसेना व शिवसेना पदाधिकारी विशाल कोरके यांचे आभार मानले. याप्रसंगी शहर संघटिका नीलिमा शास्त्री, उज्वला उंमरे, किरण शेळके, नलिनी सदावरती, रूपाली लाखे, अनिता डोमळे, उज्वला शंभरकर, सोनाली उंमरे, किशोर सुरेश ढोके, रामदास उंमरे, आरती शर्मा उपस्थित होते.








