किशोर साहू, मौदा :- बुधवार (दि. २६ नोव्हेंबर) ला ग्रामपंचायत येसंबा येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपसरपंच धनराज हारोडे यांच्या हस्ते करून संविधानाचे वाचन करण्यात आले.
याप्रसंगी शिक्षक वृंद जाधव , काकडे , कृषी सहाय्यक जुमळे, पोलिस पाटील नरेंद्र राऊत, आयसिआरपी हिरा चकोले, अंगणवाडी सेविका माया चकोले, मदतनीस कांता गजभिये, निधी मेश्राम, मिनाक्षी कारोंडे, हितेश भेलावे, सचिन भोयर, ग्रामपंचायत कर्मचारी संजय गजभिये अंगणवाडीतील विद्यार्थी उपस्थित होते.








