spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पीएम श्री जि प उच्च प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा 

किशोर साहू, मौदा :- पीएम श्री जि प उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे 26 नोव्हेंबर 2025 ला संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान दिनाच्या निमित्ताने पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे सुरुवातीला प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरी झाल्यानंतर संविधान दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश इंगळे , उपाध्यक्ष रणधीर आंबिलढुके उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी आपल्या जीवनात संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना विशद करून सांगितले.

या कार्यक्रमानिमित्त आज संविधानवर आधारित विद्यार्थ्यांची भाषणे घेण्यात आली. प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांची नृत्य आणि विद्यार्थ्यांची वादविवाद स्पर्धा सुध्दा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन स्वराली हटवार यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी सुधीर कांबळे, राजेश रोहाड यांनी संविधानावर आधारीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकवृंद सुधीर खंडाईत , सुधीर कांबळे, राजेश रोहाड ,लीलाधर काळबांडे ,प्रज्ञा रामटेके , सुजाता बोदेले, संगीता आंबिलढुके, उमेश उके ,पुष्पलता उके यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न ककेलेशं.आभारप्रदर्शन शिक्षक राजेश रोहाड यांनी केले.

Popular Articles