spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विजेच्या खांबावरून पडून कंत्राटी कामगारांच्या मृत्यू 

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- विद्युत पोलवर चढून दुरुस्तीचे काम करत असताना खाली पडल्याने एका कंत्राटी कामगाराच्या जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवार (दि.१६) मार्चला सकाळच्या सुमारास घडली. सेवकराम कोटीराम मलघाम (वय ३२ रा. डोंगरताल ) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेवकराम मलघाम हे गेल्या दोन वर्षांपासून एबी इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या ठेकेदारामार्फत महावितरणमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होता. सोमवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास ते वाघोली (पिपरिया) येथे महावितरणच्या विद्युत पोलवर चढून दुरुस्तीचे काम करत होते. काम करीत असतांना त्यांचा तोल जाऊन ते अचानक पोलवरून खाली कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर सहकाऱ्यांनी व स्थानिकांनी त्यांना तातडीने देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीअंती उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेनंतर कामगारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित कामगाराला काम करताना आवश्यक असलेली सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली नव्हती, असा आरोप स्थानिकांकडून व कामगारांकडून करण्यात येत आहे. या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.

कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह….

महावितरणच्या नियमांनुसार विद्युत खांबावर प्रशिक्षित लाईनमननेच चढून दुरुस्तीची कामे करणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात मदतनीस व कंत्राटी कामगारांना खांबावर चढवून काम करून घेतले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. तसेच अशा कामांसाठी संबंधित कामगारांना पुरेशा प्रमाणात सुरक्षा उपकरणे किंवा अधिकृत वर्कऑर्डर देण्यात येत नसल्याचीही चर्चा आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.