spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चोरबाहुली शिवारात भीषन अपघात ; तिघे गंभीर जखमी 

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील चोरबाहुली शिवारात रविवारी (दि.१५) मार्च दुपारी सुमारे ३.०० वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत एमएच २६ व्ही ७५५७ क्रमांकाची स्कॉर्पिओ वाहन पलटी होऊन तिघे जण गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार उमाशंकर पारधी (रा. चाचेर, ता. रामटेक) हे आपल्या नातेवाईकांसह मध्यप्रदेशातील कुरई येथे औषधोपचारासाठी नागपूरहून जबलपूरकडे निघाले होते. चोरबाहुली शिवारात समोरील ट्रकला डिव्हायडरच्या बाजूने ओव्हरटेक करतांना मागून वेगाने येणाऱ्या यूपी ७४ टी ६६८७ क्रमांकाच्या ट्रकने स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली. धडकेनंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि स्कॉर्पिओ महामार्गावर पलटी झाली. या अपघातात सतणबाई पारधी यांच्यासह इतर तिघे जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच खुमारी येथील ओरिएंटल टोल प्लाझाचे कर्मचारी डॉ. दिपेश पंचेश्वर, सुरेश आमाडारे, त्रिभुवण सिंग आणि बंडू नखाते यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना त्वरीत देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. दअपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याच्याविरुद्ध देवलापार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास देवलापार पोलीस करीत आहेत.

Popular Articles