spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

निमखेडा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी 

किशोर साहू, मौदा :- चाचेर मंडळ अंतर्गत येत असलेल्या निमखेडा येथे आज बुधवार (ता. 11 फेब्रुवारी) ला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या फोटोला माल्यार्पण, पुष्प अर्पण करून त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी त्यांची राष्ट्रसेवा अंत्योदयाची विचारधारा आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याच्या समर्पित संदेश प्रेरणा देणारा असल्याचे उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले.

यावेळी भाजपा मौदा तालुका मंडळ अध्यक्ष रवी चव्हाण ,माजी पंचायत समिती उपसभापती खेमराज चाफले, खंडाळा (गांगणेर) सरपंच संकेत झाडे, अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष प्रल्हाद रंधई, उमेश शेंडे, राकेश पानतावणे ,दत्तू रंगारी, अभिषेक गायकवाड, अशोक बरबटे, वेंकट मेमूरी ,बाल्या रामटेके, धर्मेंद्र अमृते, युवराज बोपचे ,अमित कावळे, बाल्या हटेवार ,शुभम पटिये, रामा मते, बबन शेंद्रे उपस्थित होते.

Popular Articles