spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गुमगाव खान वसाहतीमध्ये दरोडा, चोरीच्या घटनांमध्ये वाढ

खापा,वार्ताहर :- चोरट्यांनी गुमगाव खान वसाहत येथे दोन घरात दरोडा टाकल्याची एक घटना बुधवार (दि.११) सकाळी आठ वाजता तर, दुसरी घटना दुपारी दोन वाजता उघडकीस आली. घोरफोडी मध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एकवीस हजाराचा मुद्देमाल लंपास केला. वाढत्या चोऱ्यांमुळे खापा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच मॉयलच्या सुरक्षा व्यवस्थेवरही कर्मचाऱ्यांनी प्रश्न निर्माण केलेला आहे.

संजय सूरजलाल सलामे, रा. इमारत क्र. दहा, कार्टर क्र. ए. ३८, गुमगाव माईन वसाहत, खापा हे त्यांच्या कुटुंबियांसह रविवारी खरपडिया, मध्यप्रदेश येथे गेले होते. ते बुधवारी दुपारी दोन वाजता दरम्यान घरी परतले. तर त्यांच्या घराच्या गेटवर लागलेले कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. घरात आत मध्ये प्रवेश केला, तर घराच्या मुख्य दाराचाही कुलूप तुटलेला दिसला. घरात आत प्रवेश केल्यावर बेडरूम मधील सर्वसामान अस्तव्यस्त पडलेले निदर्शनास आले. बेडरूम मध्ये असलेली कपाटाचा लॉक तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यातील सर्व सामान विखुरलेले होते. बेड रूम मधील बेडवरील गादी, कपडे, वगैरे ही समान विखुरलेले होते. त्यामध्ये असलेले मूल्यवान सोन्याचे कानाचे दागिने व २ जोड चांदीचे पायपट्टी असा एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

त्याचप्रमाणे वसाहतीतील पल्लवी कैलास डवरे, इमारत क्र. दोन, कार्टर क्र. ७, गुमगाव माईन वसाहत, खापा, या मॉयल कडून आयोजित करण्यात आलेल्या टूर्नामेंट मध्ये खेळण्यासाठी कांद्री माईन येथे गेल्या होत्या. सकाळी आठ वाजता परत आले, तेव्हा घराचे दार उघडले होते. अलमारी, बेडरूम मधील सर्व सामान अस्तव्यस्त पडलेले होते. त्यांच्याकडून कसल्याही प्रकारचे समान चोरीला गेले नाही.

घरी चोरी झाल्याचे लक्षात येताच सलामे व डवरे यांनी खापा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दोन्ही घटनास्थळी पोहोचवून फिंगरप्रिंट तज्ञ आणि श्वान पथकाला तपासणीसाठी बोलावले. पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला आणि अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्या प्रकरणात ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण बोरकर, पोलीस शिपाई परवेज शेख, राहुल रेवतकर पुढील तपास करीत आहे.

Popular Articles