spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

श्री संत पतीराम महाराज पुण्यतिथी सोहळा

खापा :- खापा येथील श्री मुरलीधर देवस्थानात ट्रस्टच्या वतीने २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान श्री संत पतीराम महाराजांचा पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सोमवारी (दि.२) सकाळी ७ वाजता यजमान चंद्रकांत वासुदेव लिखार व वैशाली चंद्रकांत लिखार यांच्या हस्ते सपत्नीक श्रीसंत पतीराम महाराज समाधी व मुर्ती तसेच गोपाळकृष्ण मुर्तीचा अभिषेक करण्यात आला. सोमवारी (दि.२) सकाळी १० वाजता अनिल मेनकुदळे यांच्या हस्ते कलश पूजन, सकाळी १०.१५ वाजता गजानन पडोळे यांच्या हस्ते घटस्थापना तर सकाळी १०.३० वाजता मधुकर घाटोळे यांच्या हस्ते यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने श्रीमद् भागवत कथेला प्रारंभ झाला.

सोहळ्यादरम्यान पहाटे काकड आरती, पूजापाठ व आरती, श्री संत पतीराम महाराज चरित्र ग्रंथाचे पारायण, श्रीमद भागवत कथा, हरीभजन, सायंकाळी आरती, रात्री श्रीमद् भागवत कथा असा दैनंदिन कार्यक्रम पार पडला.

सोमवारी (दि.९) सकाळी पालखी दिंडी काढून नगरभ्रमण करण्यात आले. यावेळी ठिकठिकाणी पालखीचे स्वागत व पूजन झाले. पालखी सहभागी भक्तंसाठी स्टॉलद्वारे अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी भागवताचार्य तेजराम कांजरेकर महाराज आळंदीकर (मु.अमृतनगर, ता. नरखेड) यांचे गोपालकाल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. मंगळवार (दि.१०) रोजी कलश यात्रेने समापन होईल.

सोहळ्यानिमित्ताने मंदिर व परिसर तोरण-पताका व विद्युत रोषणाईने सजविण्यात आला होता. यशस्वीतेसाठी भक्तगणांनी, शहरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, लहान मुल यांच्यासह मुरलीधर देवस्थान ट्रस्टच्या सर्व सभासदांनी सहकार्य केले.

Popular Articles