spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रगती नगर व सुपरटाऊन मधिल मुलभुत समस्या तातडीने सोडविण्याची मागणी

– कन्हान शहर विकास मंच व स्थानिक नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

कन्हान :- शहरातील प्रगती नगर व सुपरटाऊन मधिल नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध मूलभुत समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात यावे, अशी मागणी कन्हान शहर विकास मंच पदाधिकाऱ्यांनी व स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिपक घोडके यांना निवेदनाद्वारे केली.

प्रगती नगर व सुपरटाऊन परिसरातील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचणे व घरांमध्ये पाणी शिरण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. यंदाही पावसाळ्याच्या प्रारंभापासुनच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, गहुहिवरा रोड बॉयपास उडाण पुलाजवळील छोट्या नाल्यातुन तसेच पानतावणे कॉलेज परिसरातुन मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहुन येऊन थेट प्रगती नगर व सुपर टाऊन परिसरात शिरते. त्यामुळे नागरिकांच्या घरांचे, मालमत्तेचे तसेच आरोग्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागिल वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे संपुर्ण परिसर जलमय झाला होता. अनेक नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला होता. मात्र आजपर्यंत या समस्ये वर कायम स्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या सोबतच परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासुन मूलभुत सुविधांपासुन वंचित ठेवण्यात आल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. सिमेंट रस्त्यांच्या अभावामुळे नागरि कांना दररोज मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. परिसरात अद्याप सिमेंट रस्ता निर्माण करण्या त आला नसल्याने पावसाळ्यात चिखल, पाणी साचणे , डासांचा प्रादुर्भाव वाढणे यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. नागरिकांनी अनेकवेळा लोकप्रतिनिधी व नगर परिषद प्रशासनाकडे तक्रारी, निवेदने व मागण्या सादर करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या न्याय्य मागण्यांकडे जाणी वपुर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची भावना परिसराती ल जनतेत निर्माण झाली आहे. नागरिकांच्या करातुन मिळणारा निधी नेमका कुठे खर्च केला जात आहे ? प्रगती नगर व सुपरटाऊन परिसर विकासापासुन का वंचित ठेवला जात आहे ? स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन याबाबत मौन का बाळगत आहेत ? असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत.

प्रगतीनगर व सुपरटाऊन मध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था करा .

प्रगतीनगर व सुपरटाऊन परिसरातील नागरि कांना मागील अनेक वर्षांपासुन शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. आजही या परिसरात शुद्ध पाण्याची पाईपलाईन उपलब्ध नसल्या ने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मात्र या मूलभुत प्रश्ना कडे दुर्लक्ष करित असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या संदर्भात अनेक वेळा निवेदने देऊन व पाठ पुरावा करून ही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुद्ध पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभुत हक्क असुन प्रशासनाने तातडीने दखल घेऊन प्रगतीनगर व सुपरटाऊन परिसरात शुद्ध पाण्याची पाईप लाईन टाकुन शुध्द पाणी पुरवठा तातडीने करण्याची सुध्दा मागणी करण्यात आली. अश्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी कन्हान शहर विकास मंच सल्लागार सूर्यभान चकोले यांचे नेतृत्वात मंच पदाधिकाऱ्यांनी व स्थानिक नागरिकांनी मुख्याधि कारी दिपक घोडके यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मुख्याधिकारी दिपक घोडके यांनी नागरिकांच्या समस्या ऐकुन घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे तोंडी निर्देश दिले तसेच लवकरच समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, मार्गदर्शक भरत सावळे, नारायण गजभिये, अर्चना तांडेकर, संदीप पोकळे, संतोष दहीफळकर, दिपक गुप्ता, दिलीप लाडेकर, दिपक तिवारी, सुरेश वाघमारे, दत्तु खडसे, निखिल मेश्राम, अभिषेक साखरे, अर्जुन पात्रे, मारोतराव भोयर, सागर नानवटकर, आलोक सरोदे, राहुल चौरे, ताराचंद मेश्राम, सुदामा घोडेस्वार, अरुण सहारे, अजय डेरिया, प्रविण दुरगडे, राहुल मंगर, जगदीश साठवणे, पद्माकर वासनिक, दिलीप बंड, पिंकी बेहेटवार, हौशीलाल पुंडे, प्रिती गोंडाणे सह नागरिक मोठ्या उपस्थित होते.

Popular Articles