– पिण्याच्या पाण्याची उपलब्धता राहील असे नियोजन करावे जिल्हाधिकारी
हंसराज,भंडारा :- अल् निनो च्या धरतीवर जिल्ह्यामध्ये उपलब्ध पाणीसाठ्याचा जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी आज बैठकीत आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास , जलसंधारण अधिकारी खोब्रागडे, व अन्य अधिकारी ऑनलाइन यंत्रणेद्वारे उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत सन २०२६-२७ च्या उन्हाळी पाणी नियोजनानुसार जिल्ह्यात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. गोसीखुर्द धरण विभाग, वाही (पवनी) येथे १५ जून 2025 रोजी १३२.२७१ दलघमी इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. १५ जुलै २०२६ पर्यंत हा साठा 253.938 दलघमी इतका शिल्लक आहे, 15 जुलै ते 31 ऑगस्ट या कालावधीत पिण्याच्या पाण्यासाठी २ दलघमी, औद्योगिक वापरासाठी १२ दलघमी तर बाष्पीभवनामुळे २० दलघमी पाण्याचा वापर अपेक्षित असल्याचे कार्यकारी अभियंता राजेश ढुमणे यांनी सांगितले. राज्य शासनाच्या निर्देशानुसार पाणी बचती बाबत आलेल्या सूचनांचे पालन करून 31 ऑगस्ट 2026 अखेर 219.938 दलघमी पाणी शिल्लक राहणार आहे. या उपलब्ध पाणीसाठ्याच्या आधारे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नसून कोणतेही गाव किंवा क्षेत्र पाणीटंचाईग्रस्त म्हणून नमूद करण्यात आलेले नाही. यावेळी पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेच्या दृष्टीने नियोजन करण्याचे .निर्देश सावन कुमार यांनी दिले.
एस बैठकी पाणीटंचाईचा आढावा घेताना कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग खोब्रागडे यांनी जिल्ह्यात पाणी टंचाई अंतर्गत १५ जून पर्यंत ३५ नळ योजना विशेष दुरुस्ती, २६८ विंधन विहीर खोदकाम, २१८ विंधन विहीर विशेष दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आलेली असून ३ खाजगी विहीरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या असल्याची माहिती दिली.ग्रामपंचायत पातळीवर सर्व ग्रामस्थांनी पाण्याचा वापर जपून केल्यास भविष्यात पाणी टंचाई भासणार नाही. तसेच भविष्यात पाणी टंचाई उद्भवू नये या करिता ग्रामपंचायत स्तरावर टंचाई प्रतिबंधात्मक आराखडा तयार करून पावसाळ्यापूर्वी जुले अखेर सर्व स्त्रोत बळकटीकरण व स्त्रोत पुनर्भरणाची कामे पूर्ण करून जिल्हाधिकारी . सावन कुमार यांनी दिले.








