Monday, April 27, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ओबीसी वस्तीगृहासाठी स्वतंत्र इमारत मंजूर करण्यासाठी मागणीचे निवेदन – प्रवीण डी कळंबे (शिवसेना)

– विधान परिषदेच्या सदस्या डॉ.मनीषा कायंदे यांना शिवसेनेचे निवेदन

नागपूर :- शिवसेना ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण कळंबे यांनी नुकतेच विभागीय संपर्क प्रमुख वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली चे डॉ.मनीषा कायंदे मुख्य प्रतोद व विधान परिषद सदस्या यांना निवेदन सादर केले आणि सध्याच्या स्थितीत ओबीसी वस्तीगृह भाड्याच्या इमारतीमध्ये आहे. अपुऱ्या जागेमुळे वद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्यामुळे वस्तीगृहासाठी स्वतंत्र इमारत व्हावी. यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाकडे निवेदन दिली आहे. परंतु ओबीसी विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून व विधान परिषदेत विषय मांडून ओबीसी वस्तीगृहासाठी स्वतंत्र इमारत मंजूर करावी. अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदन देतेवेळी शिवसेनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण कळंबे, सोबतच प्रभुदास तडस, प्रशांत घोंगरे, वैभव डांगे, विलास डांगे, नरेंद्र कंदीकुलवार, प्रशांत नस्कुरी यांची उपस्थिती होती.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.