spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खिस्ती समाजाचे प्रतिनिधी अनिल जाधव यांना कर्नाटक विधान परिषदेवर नियुक्त करण्याची मागणी

नागपूर :- खिस्ती समाजाचे प्रतिनिधी व प्रसिद्ध समाजसेवक अनिल जाधव यांची कर्नाटक विधान परिषदेवर (आमदार म्हणून) नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आज नागपूर येथील संविधान चौकात करण्यात आली.

राष्ट्रीय अध्यक्षा निशा मंगल चौरसिया यांच्या नेतृत्वाखाली आयोजित कार्यक्रमात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली.अनिलकुमार जाधव यांनी गेल्या अनेक दशकांपासून बंगळुरू (कर्नाटक) येथे खिस्ती समाज तसेच अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. नोनिया ब्रिगेड ऑल इंडिया संघटनेची धुरा सांभाळताना त्यांनी विविध समाजघटकांसाठी सातत्याने कार्य केले असल्याने त्यांची कर्नाटक विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या विविध राज्यांतील समित्यांनी केली आहे. या संदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी तसेच पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे निवेदन पाठविण्यात ल्याचे सांगण्यात आले.

या आंदोलनात अखिल भारतीय अल्पसंख्याक फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत तेलंग, खिस्ती समाज मंचाचे अध्यक्ष केवलदास टेंभेकर, भीमक्रांती सेनेचे अध्यक्ष अरविंद मेश्राम, रामटेके, जयकिसन जगभिये, किशोर डोर्लीकर, संजय पोवार, कविता ठवरे, लक्ष्मीनारायण चड्डा, निलेश ढोके, दलीत थॉमस वाकोडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय योगदान देणाऱ्या अनिलकुमार जाधव यांना कर्नाटक विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी केली जात आहे.

Popular Articles