spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

टेकाडी बस थांबापर्यंत ‘आपली बस सेवा’ वाढविण्याची मागणी

– पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना ग्रामस्थांचे निवेदन

कन्हान :- टेकाडी परिसरातील नागरिक, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी शिव मंदिर जे.एन. रोड, टेकाडी बस थांबा पर्यंत ‘आपली बस सेवा’ वाढविण्या ची मागणी पालकमंत्री तथा राज्याचे महसुल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली आहे.

अनेक वर्षांपासुन बडी टर्मिनल ते जवाहर हॉस्पिटल पर्यंत स्टार बस सेवा सुरू होती. त्यानंतर ही बस कांद्री येथील जे.एन. रोडवरील दुर्गा हॉलपर्यंत वाढ विण्यात आली. मात्र टेकाडी पर्यंत बससेवा उपलब्ध नसल्याने टेकाडी परिसरातील रहिवासी, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना थांब्या पर्यंत जाण्यासाठी अतिरिक्त खर्च व त्रास सहन करावा लागत आहे. कांद्री पर्यंतच बस धावत असल्यामुळे टेकाडी परिसरातील नागरिकांना पुढील प्रवासासाठी इतर वाहनांचा आधार घ्यावा लागतो. विशेषतः विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कामठी-नागपुरला ये-जा करावी लागत असल्याने नियमित आणि परवडणारी बससेवा अत्यंत आवश्यक असल्या चे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कांद्री दुर्गा हॉलपर्यंत धावणारी ‘आपली बस सेवा’ शिव मंदिर, जे.एन. रोड टेकाडी बस थांब्यापर्यंत वाढविण्या त यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या सेवे मुळे बोरडा, वराडा तसेच इतर गावांतील नागरिक आणि विद्यार्थ्यांना वाहतुकीची मोठी सोय उपलब्ध होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या मागणी साठी भगवानदास यादव, विशाधर काबळे, राजू गुरघे, कृष्णा काबळे, ज्ञानेश्वर सातपैसे, हिरामण मेघर, बळीराम सातपैसे, रामकृष्ण हड आदी ग्रामस्थांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देत तातडीने बससेवा वाढविण्याची मागणी केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.