spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नहराचे पाणी गहू पिकाला मिळणार नसूनही, नैसर्गिक पाण्याच्या अंदाजावर मौदा तालुक्यात धानाच्या ओल्या बांध्यात युद्ध स्तरावर गहू फेकायला सुरुवात 

किशोर साहू,मौदा :- यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने, पाणी साठवून ठेवणारे पेच व इतर धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने, शेतकऱ्यांना गहू पिकाला पाणी मिळणार नसल्याचे पत्र संबंधित यंत्रणेकडून शेतकऱ्यांना कळविण्यात आले आहे व तसे पत्र सोशल मीडियाच्या विविध ग्रुप वर वायरलही करण्यात आले होते. मागील दोन-तीन वर्षापासून पेरीव गव्हाची पद्धत कमी कमी होत असून, धान कापणीच्या दहा दिवसापूर्वी धान्याच्या ओल्या बांध्यातच गहू फेकण्याची पद्धत मौदा तालुक्यात सुरू झालेली आहे. त्यामुळे गहू अंकुरण्यासाठी पाण्याची गरज भासत नाही. त्यामुळे नरसाळा,हिवरा परिसरासह तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांच्या धान पिकाच्या शेतात गहू पीक घेण्यासाठी गहू युद्ध स्तरावर फेकायला सुरुवात केलेली आहे, असे नरसाळा येथील शेतकरी दिनेश भोले यांनी त्यांच्या हिवरा परिसरात साडेसात एकर धान्याच्या बांधात आज मंगळवार ( ता.१० नोव्हेंबर)ला मजुरांच्या हाताने गहू फेकताना सांगितले. या परिसरातील जवळपास सर्व शेतकऱ्यांनी गहू फेकू केल्याचे मजुरांनी आवर्जून सांगितले.एक ते दीड महिन्यानंतर नैसर्गिक पाण्याच्या सरी कोसळल्यास, गहू पीक होण्याची शक्यता भोले यांनी वर्तवली आहे.

Popular Articles