किशोर साहू, मौदा :- धानला – चिरव्हा जि प क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या दहेगाव येथील कुंजन दूध डेअरी चे संचालक संजय आकरे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकी जपत दिवाळीनिमित्त त्यांचे ग्राहक असलेल्या सर्व दुध उत्पादकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन बकेटचे वाटप केले. दूध उत्पादनांमध्ये बहुतांश शेतकरी वर्ग असून, यंदा दुष्काळामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. अशा परिस्थितीत दूध डेअरी चे संचालक आकरे यांनी बकेटचे वाटप केल्याबद्दल दूध उत्पादकांनी त्यांचे खूप खूप आभार मानले.
Latest News
Related Posts
दहेगाव येथे दूध उत्पादकांना बकेटचे वाटप






