spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

धम्म अशोक बुद्ध विहारात भिक्खू संघाला भोजनदान

– वर्षावास निमित्त थायलंडमधील भिक्खूंचे स्वागत

वाडी :- वाडी टेकडी येथील धम्म अशोक बुद्ध विहारात वर्षावासाच्या पावन पर्वानिमित्त थायलंड निवासी भिक्खू संघाला भोजनदान करण्यात आले. सध्या थायलंडमधील अनेक भन्ते चिंचोली येथील शांतिवन बुद्ध विहारात तीन महिन्यांच्या विशेष वर्षावास व ध्यान साधनेसाठी वास्तव्यास आहेत. त्यांना धम्म अशोक बुद्ध विहाराच्या वतीने भोजनदान तसेच धम्मप्रचारासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

भिक्खू संघाचे विहारात आगमन झाल्यानंतर आम्रपाली महिला मंडळाच्या वतीने पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. यावेळी सेवक तिरपुडे, चंद्रशेखर गणेश, सुरेश उके, प्रभाकर डूले, आनंद चोखांद्रे, इंदिरा चोखांद्रे आदी उपस्थित होते. त्यानंतर भिक्खू संघाच्या हस्ते भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.

यावेळी भिक्खू सुमंगल सुद्धासो यांनी धम्मदेशना दिली तसेच परित्त सुत्ताचे पठण करण्यात आले. भिक्खू नठऊथ भदरवरो, भिक्खू फा.महा नठफोग धम्मविभूतो, बिरेद्र धम्मवुट्ठो, भिक्खू तेज तेज वरो आणि भिक्खू मनीष झायिनो यांनी उपस्थितांना चिंचोली येथील शांतिवन बुद्ध विहारात २ ते ६ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या धम्म शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इंदिरा चोखांद्रे, शोभा पक्कीडे, सपना कापसे, सुलोचना मेश्राम, लीला बागडे, मीना राज, कविता कापसे, विशाखा लोखंडे, उषा उके, राधाबाई कापसे, डॉ. सुबोध उके, प्रभाकर डूले, रविंद्र कापसे आदींनी सहकार्य केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.