spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

टसर रेशीम उद्योगास चालना देण्यासाठी संचालक विनय मुन यांची बोरीचक गावाला भेट, कोष खरेदी व यंत्रसामग्रीची पाहणी

 

गडचिरोली,  दि. 26 : जिल्ह्यातील टसर रेशीम उद्योगाला चालना मिळावी, तसेच शेतकऱ्यांना थेट
शासन योजनांचा लाभ मिळावा यासाठी रेशीम संचालनालय, नागपूरचे संचालक विनय मुन यांनी दिनांक 21
जून 2025 रोजी आरमोरी तालुक्यातील बोरीचक गावाला भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी टसर रेशीम कोष
उत्पादन आणि व्यवस्थापनाचे थेट निरीक्षण केले.
यावेळी  मुन यांनी टसर टी.व्ही. व्यापारी कोषाची पाहणी केली आणि शासनस्तरावर सुरू
असलेल्या कोष खरेदी प्रक्रियेची माहिती शेतकऱ्यांना दिली. तसेच उन्नती मशीन, बुनियाद मशीन यांसारख्या
अत्याधुनिक यंत्रसामग्रीची पाहणी करत त्याच्या कार्यपद्धतीबाबत माहिती जाणून घेतली.
बोरीचक, बोड्डा, सुर्यडोंगरी आदी गावांतील टसर उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत टसर रेशीम
बाजारपेठ (RMB), कोष खरेदी, वनक्षेत्राशी संबंधित समस्या, कोष धागाकरण प्रशिक्षण यांसारख्या विषयांवर
सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांनी त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी स्पष्टपणे मांडल्यावर संचालकांनी त्या
समस्यांवर सकारात्मक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
या भेटीदरम्यान प्रादेशिक रेशीम कार्यालय, नागपूरचे सहायक संचालक हेमंत लाडगावकर, जिल्हा
रेशीम विकास अधिकारी ए.व्ही. वासनिक, देऊळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख, क्षेत्र सहाय्यक यु.डी. मेश्राम, विलास
मेश्राम, तसेच सुर्यडोंगरी येथील टसर खाजगी ग्रेन्युवर्स आणि टसर शेतकरी मार्गदर्शक एस.व्ही. रामटेके
उपस्थित होते.
टसर रेशीम शेतीबाबत अधिक माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी जिल्हा रेशीम कार्यालय, आरमोरी येथे
संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.