spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हान येथे रिपब्लिकन सांस्कृतिक संघातर्फे बोधीवृक्षांचे वाटप

– चंद्रशेखर भिमटे यांचा पर्यावरण संरक्षणाचा संदेश; बोधीवृक्ष लागवडीचे आवाहन

कन्हान :- शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रविवारी सकाळी रिपब्लिकन सांस्कृतिक संघाच्या वतीने बोधीवृक्ष वितरणाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमा ला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. रिपब्लिकन सांस्कृतिक संघाचे संस्था पक अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांनी अभिवादन केले. त्यानंतर भदंत केसीएस लामा यांनी बोधीवृक्षासाठी विशेष प्रार्थना केली. प्रार्थनेनंतर चंद्रशेखर भिमटे व भदंत केसीएस लामा यांच्या हस्ते नागरिकांना बोधी वृक्षांचे वितरण करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना चंद्रशेखर भिमटे म्हणाले की, “बोधीवृक्षाला धार्मिक महत्त्व तर आहेच, पण पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि मानवी जीवन अधिक निरोगी करण्यासाठीही त्याचे मोठे योगदान आहे. पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येकाची सामुहिक जबाबदारी असुन अशा वृक्षारोपण व वृक्षवाटपाच्या मोहिमा राज्य, जिल्हा, महानगर आणि तालुका स्तरावर सातत्याने राबविण्याची गरज आहे. समाज आणि शासन यांनी एकत्रितपणे निसर्गसंवर्धनासाठी पुढाकार घेतल्यास भावी पिढ्यांना सुरक्षित आणि हिरवेगार पर्यावरण मिळु शकेल.” या उपक्रमाला रिपब्लिकन सांस्कृतिक संघाचे महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नितीन मेश्राम, इंडियन बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक अनिल ‘शील’, पंजाब नॅशनल बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक गजभिये सर, समाजसेवक मनोज गोंडाणे, सामाजिक कार्यकर्ते नयन खोब्रागडे, दीपक तिवाडे, नरेश चिमणकर, शरद मेश्राम, रोशन मेश्राम यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोधीवृक्ष स्विकारण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम कन्हान शहरात विशेष चर्चेचा विषय ठरला.

Popular Articles