spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

 अंगणवाडीत डिजिटल पाटी वाटप

 

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर

यवतमाळ ३० : लोकेश दिवे मित्रपरिवाराने सदस्य क्षितिज घायवटे यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली येथील अंगणवाडीत एक अनोखा उपक्रम राबवला. बालमित्रांना शिक्षणाची गोडी लागावी आणि त्यांना लिखाणाची सवय लागावी या उद्देशाने अंगणवाडीतील मुलांना डिजिटल पाट्या आणि चॉकलेट्सचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. लोकेश दिवे मित्रपरिवार भविष्यातही असेच लोकहिताचे सामाजिक कार्यक्रम राबवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी लोकेश दिवे मित्रपरिवाराचे सदस्य लोकेश दिवे, दुर्वेष उमाटे, स्वप्नील ठाकरे, क्षितिज घायवटे, साहिल वनकर, सारिपुत्र वनकर यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles