spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नगरसेवक अनिल सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

कामठी :- स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक अनिल सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन, पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. शिक्षण हेच प्रगतीचे प्रभावी साधन असून, विद्यार्थ्यांनी ज्ञानाच्या बळावर स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवावे, या उद्देशाने उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांना “शिका, पुढे चला आणि देश घडवा” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी मन लावून शिक्षण घेत आपल्या कर्तृत्वातून कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.

याप्रसंगी नगरसेवक अनिल सूर्यवंशी, नगराध्यक्ष अजय भाऊ अग्रवाल, गटनेते काशीनाथ प्रधान, नगरसेवक धीरज यादव, नगरसेवक योगेश गायधणे, नगरसेवक लालसिंग यादव, अजय सूर्यवंशी, मंगेश यादव, क्षमा घरडे, शारदा नागदेवे, अनिता सिंगाडे, पल्लवी डोंगरे, सीमा नागदेव, दिशा पिल्ले, आहान सूर्यवंशी, आदित्य रामटेके, मोहित लोणारे, आर्यन राऊत, एल. पी. रामटेके, सुमित ठवरे, माया रामटेके, सुधा राऊत आदी उपस्थित होते.

Popular Articles