Home Latest News मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्मार्ट व्हिजन’ उपकरणांचे वाटप

मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्मार्ट व्हिजन’ उपकरणांचे वाटप

0

<p><strong>&&num;8211&semi; कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानामुळे स्वावलंबनाकडे नवे पाऊल&semi; जिल्हा परिषद व महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचा संयुक्त उपक्रम<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>गडचिरोली &colon;-<&sol;strong> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सक्षम व स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद गडचिरोली व महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित &&num;8216&semi;स्मार्ट व्हिजन&&num;8217&semi; उपकरणांचे वाटप करण्यात आले&period; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते दृष्टीदोष असलेल्या ३४ विद्यार्थ्यांना ही उपकरणे प्रदान करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीमार्फत आयोजित &&num;8216&semi;महाराष्ट्र स्टार्टअप वीक&&num;8217&semi; स्पर्धेत विजेते ठरलेल्या डीप व्हिजन टेक या स्टार्टअप कंपनीने विकसित केलेले हे &&num;8216&semi;स्मार्ट व्हिजन&&num;8217&semi; उपकरण दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे&period; जिल्हा परिषद गडचिरोलीला या उपक्रमांतर्गत एकूण ५० उपकरणे प्राप्त झाली असून&comma; त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३४ विद्यार्थ्यांना उपकरणांचे वाटप करण्यात आले&period;<img class&equals;"alignnone wp-image-56075 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;07&sol;3e750018-13d8-4201-98b7-5cd8ebad749b&lowbar;copy&lowbar;800x554&period;webp" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"554" &sol;><&sol;p>&NewLine;<p>यावेळी विद्यार्थ्यांना उपकरणाच्या वापराबाबत&comma; त्यातील विविध सुविधा तसेच प्रत्यक्ष हाताळणीविषयी तज्ज्ञांकडून प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले&period; त्यामुळे विद्यार्थ्यांना या उपकरणाचा प्रभावी वापर करून दैनंदिन जीवनात अधिक आत्मविश्वासाने वावरता येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>&&num;8216&semi;स्मार्ट व्हिजन&&num;8217&semi; उपकरणाच्या माध्यमातून समोरील वस्तू&comma; अडथळे आणि परिसराची माहिती ध्वनीच्या स्वरूपात मिळते&period; तसेच पुस्तके&comma; वर्तमानपत्रे व इतर मुद्रित मजकूर वाचून दाखविणे&comma; चलनी नोटा ओळखणे&comma; परिचित व्यक्तींची ओळख पटविणे तसेच जीपीएसच्या सहाय्याने मार्गदर्शन करणे अशा अत्याधुनिक सुविधा या उपकरणात उपलब्ध आहेत&period; त्यामुळे शिक्षण&comma; प्रवास आणि दैनंदिन व्यवहार अधिक सुरक्षित&comma; सुलभ व स्वावलंबीपणे करणे शक्य होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या उपक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही उपकरणे &&num;8216&semi;महाराष्ट्र स्टार्टअप वीक&&num;8217&semi; स्पर्धेतील विजेत्या स्टार्टअपकडून उपलब्ध झाल्याने त्यासाठी जिल्हा परिषद गडचिरोलीवर कोणताही आर्थिक भार पडलेला नाही&period; उपकरणांच्या खरेदीचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीमार्फत करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण&comma; स्वावलंबन आणि सामाजिक सहभाग अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून&comma; या उपक्रमाला विद्यार्थी व पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जिल्हा दीव्यांग सक्षमीकरण अधिकारी चेतन हिवंज यांनी दिली आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version