spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिल्हास्तरीय ६५ वी सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा मुलचेरा येथे १६ व १७ जुलैला

गडचिरोली :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ६५ वी सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा सन २०२६-२७ चे आयोजन दि. १६ व १७ जुलै २०२६ रोजी तालुका क्रीडा संकुल, मुलचेरा येथे करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी उपस्थिती दि. १६ जुलै रोजी सकाळी १० वाजता राहील.

स्पर्धेत १५ वर्षांखालील (मुले) तसेच १७ वर्षांखालील (मुले व मुली) गटांचा समावेश असून, सहभागी होणाऱ्या सर्व संघांनी व खेळाडूंनी www.subrotocup.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच प्रवेश अर्ज दि. १४ जुलै २०२६ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे ऑफलाइन सादर करावेत.

स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी जन्मदाखला, पहिल्या इयत्तेतील जनरल रजिस्टरची सत्यप्रत, आधार कार्ड तसेच आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र (१४ वर्षांखालील खेळाडूंसाठी) सोबत आणणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक (मो. ९५०३३३११३३) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.

Popular Articles