spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीवर गुन्हा नोंद जिल्हा वाहतूक शाखा

कुही :- जिल्हा वाहतूक शाखेचे पथक पोलीस स्टेशन कुही हद्दीत पेट्रोलीग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, अवैधरित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतुक केली जात आहे. नमुद पथकाने सदर माहीती कुही पोलीसांना देत कुही पोलीसांसह सयुंक्तीक कारवाई करत मिळालेल्या माहीतीच्या आधारे मौजा कुही फाटा, येथे नाकाबंदी केली असता संशयीत वाहन टिप्पर क्र. एम एच ४९ सी आर २१२२ मिळुन आला. वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये रेती आढळुन आली. वाहन चालकाला नाव पत्ता विचारला असता १) हेमरतन मोरेश्वर येसमकर, वय ३७ वर्ष, रा. बालाजी नगर, नागपुर अशी माहीती प्राप्त झाली. आरोपी चालकाला रेती वाहतूकीच्या परवान्याबाबत विचारपुस केली असता त्याने कोणताही परवाना नसल्याबाबत सांगितले. टिप्पर मालकाचे नाव विचारले असता चालकाने स्वतःच मालक असल्याचे सांगितले. पोलीसांनी पंचासमक्ष १) टिप्पर क्र. एम एच ४९ सी आर २१२२ किंमती ४०,००,०००/- रूपये व १० ब्रास रेती किंमती ५०,०००/- रूपये असा एकुण ४०,५०,०००/- रूपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.

सदर प्रकरणी आरोपीविरूध्द पोस्टे कुही येथे कलम ३०३(२) भा.न्या.सं. सहकलम ४८(७), ४८(८) महाराष्ट्र जमिन महसुल संहीता, सहकलम ४, २१ खान खनिज अधिनियम, सहकलम ०३ सार्वजनिक मालत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.