नागपूर :- आदिवासी उडाण बहुउद्देशिय विकास संस्था नागपूर च्यावतीने 14 एप्रिल रोजी महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती सेवादल नगर नागपूर, येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनेश सिडाम अध्यक्ष नागपूर शहर गोंगपा , प्रमुख पाहुणे प्रशिल कोडापे, निलीनी दडांजे उपस्थित होते. मान्यवरांनी प्रेरणादायी मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गंगा डी. टेकाम यांनी केले व सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच न्याय, समता आणि बंधुतेचा अनोखा संगम! त्यांच्या विचारांनी लाखो लोकांचे जीवन उजळवले, अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ दिलं. भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी केवळ कायदे बनवले नाहीत, तर प्रत्येक वंचित घटकाला आपलं हक्काचं स्थान दिलं आहे. त्यांचा संघर्ष आजही नव्या पिढीला मार्गदर्शक ठरतो. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन किर्ती युवनाते यांनी केले. नम्रता टेकाम, माधूरी मरकाम, वंदना मरकाम, वर्षा परचाके, कमल आत्राम, अर्चना कुळमते शिल्पा कुंभरे व तसेच समस्त बंधू आणि भगिनीं प्रामुख्याने उपस्थित होते.
Home Latest News सेवादल नगरात आदिवासी उडान बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती...




