Home Latest News पीएम श्री जि प उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब...

पीएम श्री जि प उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

0
207

किशोर साहू, मौदा :- पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष नितेश इंगळे उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती दहेगाव चे उपाध्यक्ष रणधीर आंबिलढुके, दहेगाव येथील पोलिस पाटील प्रभाकर अहिरकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष भगवान आंबिलढुके, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष संजय मेहर ,गौरीशंकर आंबिलढुके, चंद्रमनी पाटील, माजी सरपंच रमेश आंबिलढुके,यशव़त आंबिलढुके , उपसरपंच संदिप आंबिलढुके उपस्थित होते.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस नितेश इंगळे यांनी दिपप्रज्वलन करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सर्व उपस्थित मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन केले. यांनतर दहेगाव येथे गावात प्रभात फेरी काढण्यात आली.प्रभातफेरी मध्ये गट ग्रामपंचायत दहेगाव येथील सरपंच भारती संदीप आंबिलढुके, उपसरपंच रविंद्र ढोमणे गट ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समिती दहेगाव चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आले.

मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रसंगावर आधारित माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. विद्यार्थ्यांची भाषणे झाली यात मानवी हटवार , अवनी आंबिलढुके, एंजल घडोले,मानवी घडोले,वंश आंबिलढुके, योगराज आकरे,मंथन आंबिलढुके,या विद्यार्थ्यांनी भाषण दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी सुंदर असे नृत्य सादर केले. शिक्षक राजेश रोहाड यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे संचालन राजेश रोहाड यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारमंच प्रेरणादायी गटांकडून विद्यार्थ्यांना पेन, नोटबुक, बिस्कीटपुडा चे वाटप करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिलाधर काळबांडे , सुधीर खंडाईत, ,सुधीर कांबळे , राजेश रोहोड, सुजाता बोदेले , प्रज्ञा रामटेके , संगीता कारेमोरे, उमेश उके ,पुष्पलता उके, आणि कैलास फटिंग, यांनी विशेष सहकार्य केले आभार प्रदर्शन सुजाता बोदेले यांनी केले.