spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

डॉ. कल्याणी नंदेश्वर (साळुंके) यांना ‘नाडी परीक्षक’ पदवी प्रदान; राष्ट्रीय नाडी-विज्ञान अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण

हंसराज, भंडारा नागपूर :- समुपदेशन, मानसोपचार, अंकशास्त्र आणि आयुर्वेद या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. कल्याणी नंदेश्वर (साळुंके) यांनी स्वामी विवेकानंद युनिव्हर्सिटी, सागर (मध्य प्रदेश) यांच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय नाडी-विज्ञान’ (Pulse Diagnosis) अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या यशाबद्दल त्यांना ‘नाडी परीक्षक’ या अधिकृत प्रमाणपत्राने गौरविण्यात आले आहे.

डॉ. कल्याणी नंदेश्वर या गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांची नाडी परीक्षण या प्राचीन आयुर्वेद विषयातील आवड आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची दखल घेऊन हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. नाडी परीक्षणाद्वारे आजाराचे अचूक निदान करून रुग्णांना आयुर्वेदाच्या माध्यमातून योग्य दिशा दाखवण्याचे कसब त्यांनी आत्मसात केले आहे.

डॉ. कल्याणी या केवळ आयुर्वेदच नव्हे, तर मानसोपचार आणि समुपदेशन क्षेत्राच्या माध्यमातून समाजातील मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी सातत्याने जनजागृती करत आहेत. त्यांच्या या नवीन शैक्षणिक यशामुळे आयुर्वेद आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात अधिक प्रभावीपणे काम करण्याची संधी त्यांना उपलब्ध झाली आहे.

या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, सहकारी,मित्रपरिवार व हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यात नाडी परीक्षण आणि आयुर्वेद शास्त्राचा उपयोग करून पीडित रुग्णांची सेवा करण्याचा व समाज अधिक निरोगी करण्याचा मानस डॉ. कल्याणी नंदेश्वर यांनी व्यक्त केला आहे.

Popular Articles