Home Latest News दारुड्या पतीने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवले

दारुड्या पतीने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवले

0

<p><strong>अमरावती &colon;<&sol;strong> अमरावतीमध्ये एका मद्यधुंद पतीने आपल्या पत्नीवर पेट्रोलने भरलेली प्लॅस्टिकची कॅरीबॅग फेकून लायटरने आग लावल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी &lpar;१९ सप्टेंबर&rpar; रात्री घडली&period; या हल्ल्यात महिला गंभीररित्या भाजली असून&comma; तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>घटनेनुसार&comma; पती शरिफ खान पठाण &lpar;रा&period; अमरावती&rpar; याला दारूचे व्यसन असल्यामुळे त्याची पत्नी मुलांसह वेगळ्या घरात राहायला गेली होती&period; मात्र&comma; घटनेच्या दिवशी शरिफ खान तिच्या घरी आला आणि त्याने पेट्रोलने भरलेली कॅरीबॅग तिच्या अंगावर फेकली व लायटरने पेटवून दिले&period; यात महिलेची पाठ&comma; मांडी&comma; उजवा हात&comma; आणि दोन्ही कान गंभीररित्या भाजले असून&comma; तिचे कपडेही जळाले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>या घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली&period; पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी शरिफ खान पठाणविरुद्ध गुन्हा दाखल केला असून&comma; पुढील तपास सुरु आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; pudhari news<&sol;p>&NewLine;

Exit mobile version