Monday, April 27, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शैक्षणिक : विद्यार्थ्यांना ॲबकस चे धडे, गणित विषयाची भिती होणार दूर

खापा, वार्ताहर :- स्थानिक जिजामाता विद्यालय व कनिष्ठ कला महाविघालय, खापा येथे जिनियस किड्स अकॅडमी, खापा यांच्या तर्फे तिन दिवसीय ॲबकस विषयी जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य सुधाकर गजभिये तसेच जिनियस किड्स अकॅडमी संचालिका निरंजना पुंड, जेष्ठ शिक्षिका मुक्ता कडु यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांमध्ये बौध्दिक क्षमतेत वाढ होणे, मेंदुचा विकास, गणित विषया बाबतची भिती दुर करणे, गुणाकार, भागाकार, वर्गमुळे, घनमुळ, सेकंदात तयार करणे. या विषयावर उद्बोधन वर्ग घेण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाबद्दल असलेली भीती दूर करणे, हा या आयोजनाचा मागील मुख्य हेतू होता.

या कार्यक्रम समारोप प्रसंगी शाळेचे शिक्षक राजेन्द्र भोंगाडे, रचना मोहने, भारती कुमरे आदी शिक्षक शिक्षका व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन पल्लवी धुव्वाधपार हिने केले. तर शाळेच्यावतीने उपस्थितांचे आभार विद्या गभने हीने मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.