Home Latest News चंद्रपूर, यवतमाळमधील प्रदूषणावरील उपाययोजनांच्या  कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा – पर्यावरणमंत्री पंकजा...

चंद्रपूर, यवतमाळमधील प्रदूषणावरील उपाययोजनांच्या  कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा – पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे निर्देश

0

<p><strong>&&num;8211&semi; केवळ चर्चेवर भर न देता कृतीवर भर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; अल्प&comma; मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; चंद्रपूर परिसरातील प्रदूषण जास्तीत जास्त नियंत्रणात आणण्यासाठी उद्योगांना स्पष्ट व कडक निर्देश<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong> à¤®à¥à¤‚बई &colon;-<&sol;strong> चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील कोळसा खाणी व कोल वॉशरीजमुळे हवेची व पाण्याची गुणवत्ता घसरून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी अल्प&comma; मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले&period; केवळ चर्चेवर भर न देता&comma; प्रत्यक्ष कृतीसाठी तीन टप्प्यांत कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रांत कार्यरत असलेल्या उद्योगपतींच्या शिष्टमंडळासोबत कोल वॉशरीज तसेच कोळसा खाणींमुळे होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात मंत्री मुंडे यांनी मुंबईत बैठक घेतली&period; यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रदूषणाची सद्यःस्थिती&comma; प्रदूषण होण्याची प्रमुख कारणे आणि त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सादरीकरण करण्यात आले&period; यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार यांच्यासह चंद्रपूर व यवतमाळमधील कोळणा खाण व कोल वॉशरीज कंपन्यांचे अधिकारी&comma; प्रतिनिधी तसेच चंद्रपूर विभागाचे विभाग समन्वयक डॉ विश्वजीत ठाकूर&comma; प्र&period; वैज्ञानिक अधिकारी व इतर प्रदुषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>चंद्रपूर परिसरातील प्रदूषण जास्तीत जास्त नियंत्रणात आणण्यासाठी उद्योगांना स्पष्ट व कडक निर्देश देत मंत्री मुंडे यांनी सांगितले की&comma; चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अल्प&comma; मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे&period; कोळसा खाणी&comma; कोल वॉशरीज आणि कोळशाच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण हे या परिसरातील प्रदूषणाचे प्रमुख स्रोत आहेत&period; विशेषतः कोळशाची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याने भविष्यात रस्ते वाहतुकीऐवजी रेल्वे&comma; कन्व्हेयर बेल्ट आणि झाकलेल्या कन्व्हेयर प्रणालीचा अधिक वापर करण्यावर भर देण्यात यावा&period;<img class&equals;"alignnone wp-image-55812 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;07&sol;चंद्रपूरआणियवतमाळजिल्ह्यातीलउद्&period;त्रा&period;ंरदूषणासंदर्भातश्रीमतीमुंडेयांचीबैठक2&lowbar;copy&lowbar;800x600&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"600" &sol;><&sol;p>&NewLine;<p>कोळसा खाणी व कोल वॉशरीज उद्योगांनी अल्पकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करावा&period; येत्या तीन महिन्यांत कोणत्या उपाययोजना केल्या जाणार आहेत&comma; त्याची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देशही मंत्री मुंडे यांनी यावेळी दिले&period; या आराखड्यात वृक्षारोपण&comma; धूळ नियंत्रण&comma; प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना&comma; परिसरातील जनजागृती आणि पर्यावरण संवर्धनाच्या कामांचा समावेश करण्यात यावा&comma; अशी सूचना त्यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;<p>कोळसा खाणी आणि कोल वॉशरीजच्या परिसरात आवश्यक त्या ठिकाणी बफर झोन तयार करण्यात यावे&period; यामुळे प्रदूषणाचा परिसरातील नागरिकांवर होणारा परिणाम कमी करण्यास मदत होणार आहे&period; उद्योगांनी आपल्या परिसरातील पर्यावरणीय स्थिती सुधारण्यासाठी स्वतःची जबाबदारी निश्चित करावी&comma; असेही मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>उद्योगांनी त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा &lpar;सीएसआर&rpar; उपयोग पर्यावरण संवर्धनासाठी करण्यावर भर देण्याबरोबरच परिसरातील गावांमध्ये पर्यावरण संरक्षण&comma; वृक्षारोपण&comma; आरोग्य&comma; शाळा&comma; रस्ते तसेच अन्य आवश्यक मूलभूत सुविधांसाठीही त्याचा प्रभावी वापर करावा&period; शासनाच्या क्षेत्रातील आवश्यक पायाभूत सुविधांसाठी शासनाकडून कोणत्या प्रकारची मदत आवश्यक आहे&comma; याची माहिती संबंधित उद्योगांनी सादर करावी&period; शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल&comma; असेही त्यांनी यावेळी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याचा औद्योगिक विकास महत्त्वाचा आहेच&comma; पण त्यासोबतच नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाचे रक्षण ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे&period; प्रदूषणावर जास्तीत जास्त नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही&period; प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांचे काटेकोर पालन करणे ही प्रत्येक उद्योगाची सामाजिक जबाबदारी आहे&period; त्यामुळे उद्योगांनी संबंधित उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात&comma; असे निर्देशही पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रदूषण कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना सुरू करण्यापूर्वीची स्थिती आणि उपाययोजनांनंतर झालेली सुधारणा यांची छायाचित्रे व इतर माहितीच्या माध्यमातून नोंद ठेवण्यात यावी&period; त्यामुळे प्रत्येक उपाययोजनांचा प्रत्यक्ष परिणाम तपासता येणार आहे&comma; असेही यावेळी सुचविण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या वतीने ४०० हेक्टर क्षेत्रावर सुमारे दोन लाख वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती डब्ल्यूसीएलच्या प्रतिनिधींनी बैठकीत दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>सदस्य सचिव रेखावार यांनी सादरीकरणाद्वारे प्रदूषण रोखण्यासाठी अल्प&comma; मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांची माहिती दिली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>अशा आहेत उपाय योजना<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>अल्पकालीन उपाययोजना &colon;<&sol;strong> तात्काळ अंमलात आणता येतील अशी तंत्रज्ञाने&comma; धुळीचे नियंत्रण&comma; सायडिंग व वाहतूक व्यवस्थापन सुधारणे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>मध्यमकालीन उपाययोजना &colon;<&sol;strong> सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प &lpar;ईटीपी&sol;एसटीपी&rpar;&comma; औष्णिक व रासायनिक कचरा व्यवस्थापन आणि हरित पट्ट्यांचा विस्तार&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>दीर्घकालीन उपाययोजना &colon;<&sol;strong> शाश्वत तंत्रज्ञानाचा स्वीकार&comma; स्वच्छ ऊर्जा स्रोतांचा वापर आणि &&num;8216&semi;झिरो लिक्विड डिस्चार्ज&&num;8217&semi; व कमीत कमी उत्सर्जनाकडे उद्योगांची वाटचाल&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version