Home Latest News मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याला  सन्मानपूर्वक आणि सुखकर यात्रा देण्याचा शासनाचा संकल्प

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याला  सन्मानपूर्वक आणि सुखकर यात्रा देण्याचा शासनाचा संकल्प

0

<p><strong>&&num;8211&semi; बोधगया येथे महाराष्ट्राच्या यात्रेकरूंना मिळणार कायमस्वरूपी निवास सुविधा &&num;8211&semi; सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; दादरहून बोधगयाकडे विशेष तीर्थदर्शन रेल्वे रवाना<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही केवळ तीर्थयात्रा नसून ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्यभराचे स्वप्न पूर्ण करणारी योजना आहे&period; प्रत्येक लाभार्थ्याला सन्मानपूर्वक&comma; सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे&period; बोधगया येथे दर्शनासाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील यात्रेकरूंना भविष्यात कायमस्वरूपी आणि दर्जेदार निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून&comma; त्यासाठी तेथे १० एकर जागा उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बोधगया येथे जाणाऱ्या विशेष तीर्थदर्शन रेल्वेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते&period; मंत्री संजय शिरसाट व मान्यवरांच्या हस्ते बोधगया येथे भाविकांना घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला दादर रेल्वे स्थानकावरून हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले&period; यावेळी आमदार कालिदास कोळंबकर&comma; आमदार मनीषा कायंदे&comma; आमदार तुकाराम काते&comma; सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ&period; हर्षदीप कांबळे&comma; तसेच समाजकल्याण विभागाचे मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी आदी मान्यवर उपस्थित होते&period;  <img class&equals;"wp-image-55816 size-full alignleft" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;07&sol;Hon&period;SanjayShirsatBodhGayaDarshanRailwayYatraundertheChiefMinisterTeerthDarshanYojana1&lowbar;copy&lowbar;800x438&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"438" &sol;><&sol;p>&NewLine;<p>मंत्री संजय शिरसाट म्हणाले&comma; बोधगयाला दरवर्षी मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील भाविक आणि यात्रेकरू भेट देतात&period; त्यांना निवासासाठी कोणतीही अडचण येऊ नये&comma; यासाठी तेथे कायमस्वरूपी सुविधा उभारण्याचा शासनाचा मानस आहे&period; बोधगया येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंसाठी कायमस्वरूपी निवासाची सुविधा उभारण्याच्या दृष्टीने जागा उपलब्ध करून घेण्याबाबत शासन सकारात्मक पावले उचलत असल्याची माहितीही त्यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>अनेक ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक किंवा कौटुंबिक कारणांमुळे आयुष्यात कधीच बोधगयाला जाण्याची संधी मिळाली नव्हती&period; मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमुळे त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत असून&comma; ही बाब शासनासाठीही समाधानाची आहे&period; यात्रेदरम्यान सर्वांनी परस्पर सहकार्य&comma; बंधुभाव आणि शिस्त राखावी&comma; गौतम बुद्ध व डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करावे आणि ही सहा दिवसांची यात्रा आनंदाने व चिंतामुक्त वातावरणात अनुभवावी&period; या यात्रेदरम्यान प्रत्येक लाभार्थ्यास आरक्षित आसन&comma; दर्जेदार भोजन&comma; नाश्ता&comma; वैद्यकीय सुविधा&comma; निवास व्यवस्था तसेच अधिकाऱ्यांचे सतत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे&period; यात्रेदरम्यान कोणालाही कोणताही त्रास होऊ नये&comma; यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून आवश्यक असल्यास लाभार्थ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा&comma; असेही मंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी सांगितले&period;<img class&equals;"alignnone wp-image-55817 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;07&sol;Hon&period;SanjayShirsatBodhGayaDarshanRailwayYatraundertheChiefMinisterTeerthDarshanYojana3&lowbar;copy&lowbar;800x408&period;webp" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"408" &sol;><&sol;p>&NewLine;<p>यावेळी आमदार कालिदास कोळंबकर&comma; आमदार मनीषा कायंदे&comma; आमदार तुकाराम काते&comma; सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ&period; हर्षदीप कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यातील नागरिकांना देशातील ऐतिहासिक&comma; धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या तीर्थस्थळांचे दर्शन घडवून आणणे&comma; तसेच समाजातील विविध घटकांना अध्यात्म&comma; सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रीय एकात्मतेची अनुभूती देणे&comma; हा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा प्रमुख उद्देश आहे&period; या विशेष तीर्थयात्रेत मुंबई शहर&comma; मुंबई उपनगर&comma; ठाणे&comma; पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील ८०० पात्र लाभार्थी सहभागी झाले आहेत&period; २० जुलै ते २६ जुलै २०२६ या कालावधीत या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या विशेष रेल्वे प्रवासादरम्यान लाभार्थ्यांना प्रवास&comma; नाश्ता&comma; भोजन&comma; निवास&comma; वैद्यकीय सुविधा तसेच इतर आवश्यक सोयी-सुविधा शासनामार्फत पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी केले तर आभार सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी मानले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version