◼️हंगामी मजूरावर उपासमारीची वेळ
◼️३० मेपासून वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर उपोषण
रामटेक :- कामावरुन तर कमी केलेच पण गेल्या चार ते पाच महिण्यांची मजूरी पण दिली नाही. वनविभागाच्या या अन्यायाविरुद्ध देवलापार व पवनी प्रादेशिक वनविभागातील शंभराहून अधिक हंगामी, पीआरटी व आरआरटी वन मजुरा सोबत अन्याय केला आहे. आमची हक्काची मजुरी द्या, अन्यथा उपोषणावर बसावे लागेल असा ईशारा देत, मजुरांनी देवलापार येथील उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे. निवेदनानुसार संबंधित वनमजूर वनविभागाच्या आदेशानुसार नियमित गस्त घालणे, अवैध वृक्षतोड, अवैध शिकार, अतिक्रमण व अवैध गौण खनिज उत्खनन रोखणे यासह वन व वन्यजीव संरक्षणासाठी विविध कामे करीत आहेत. तसेच तेंदू हंगामात तेंदू पत्ता संकलनासाठी नागरिकांना मार्गदर्शन व मदत देखील करीत असतात. असे असतानाही डिसेंबर २०२५ पासून त्यांची मजुरी थकीत ठेवण्यात आली आहे. अनेक वेळा मागणी करूनही वेतन अदा न केल्यामुळे या मजुरांवर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून उपासमारीची वेळ आली आहे. काम बंद करून मजुरीही रोखल्याने मजुरामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
३० मे पासून वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर उपोषण
येत्या २९ मेपर्यंत थकीत मजुरी अदा न झाल्यास ३० मे २०२६ पासून पवनी (प्रा.) वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा वनमजुरांनी दिला आहे. तसेच प्रशासनाने या उपोषणाला परवानगी द्यावी. अशी मागणी आशिष अंकुश भलावी, रमेश वरठी, प्रवीण खंडाते, अविनाश रोकडे, महेश कोकोडे यांच्यासह अन्यायग्रस्त मजुरांनी केली आहे यांनी दिला आहे.




