spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हाळगावात बनावट दारू रॅकेटचा पर्दाफाश; २ अटक, १९.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त

बुटीबोरी :- अंमली पदार्थ विरोधी पथक पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन बुटीबोरी अंतर्गत कन्हाळगाव येथील आशिष दारोटे यांच्या घरी दारूबावत अवैध व्यवसाय चालू आहे. सदर माहीती मिळताच नमुद पथकाने बुटीबोरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्यासह संयुक्त कारवाई करत सदर माहितीची पडताळणी करणे कामी नमुद पोलीस पथकाने पंचासमक्ष आशिष दारुटे यांच्या घराची झाडती घेतली. सदर घरहझडतीत विविध देशी/विदेशी दारू कंपन्यांचे झाकण (बुच) आणि स्टिकर/लेबल आदी साहित्य मिळून आले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी आशिष दारोटे, ३६ वर्ष, रा. सातगाव ह.मु वाडीभस्मे यांचे घरी गल्ली कं ३, अयोध्या नगर, नागपुर आणि जितेंद्रसिंग रणजीतसिंह ठाकुर, वय २५ वर्ष, रा. गणेश मंदीरा जवळ, रामनगर, वर्धा यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे पोलीसांनी कसून चौकशी केली असता महीती मिळाली की, नमुद आरोपी हे मध्य प्रदेशातून कमी किंमतीत दारू खरेदी करून अवैधरित्या दारू आणन दारूच्या बाटलींचे बूच व स्टिकर लेबल बदलून जास्त किंमतीत अवैध विक्री करत होते नमुद आरोपी ही दारू नागपुर जिल्हयालगतच्या जिल्हयात सुध्दा विक्री करीता नेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे सदर कारवाईत पोलिसांना देशी दारू विविध विदेशी दारू कंपन्यांचे बूच, स्टिकर, तसेच विदेशी दारू मिळून आली. तसेच घटनास्थळावरील आरोपीच्या चारचाकी वाहनाची झडती घेतली असता त्यात सुध्दा विदेशी दारू मिळुन आली. नमुद आरोपी हे शासनाचा कुठलाही परवाना नसतांना आपले आर्थिक फायद्यासाठी मध्यप्रदेश येथे विक्री कामी असणारी विदेशी दारु ची महाराष्ट्रात वाहतुक करुन तिच्यावरील लेबल, झाकण बदलवुन अधिक दराने विक्री करणे करीता साठवणुक करतांना मिळुन आले आहेत. नमुद आरोपीतांनी अशा प्रकारे बनावटीकरण करून महसुल बुडवुन शासनाची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले.

नमुद कारवाईत पोलीसांनी पंचासमक्ष १) ४८ नग बॉक्स मधील विविध देशी दारू भिंगरी तसेच विदेशी दारू ROYAL STAG WHISKY, MC DOWELLS No 1, OFFICER CHOICE, IMPERIAL BLUE, OC BLUE अशा विविध कंपन्यांचे बूच २) एका पिशवी मध्ये विदेशी दारूचे लेबल/स्टिकर, ३) विदेशी दारू OFFICER CHOICE १८० मिली च्या ११८ बॉटल्स् आणि ROYAL STAG ६० बॉटल्स्, ४) मारुती सुझुकी कंपनिची अल्टो चारचाकी वाहन के एम एच २० इजे १३१५, ५) दुचाकी वाहन क्रमांक एम एच ४९ बी ५७१४, ६) ३ अॅड्रॉईड मोबाईल आणि ७) रोख रक्कम २२२०/- रूपये असा एकुण १९,५७,५२० /- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नमुद प्रकरणी आरोपीतांवर पोलीस स्टेशन बुटीबोरी येथे कलम ६५ (अ) (ई) ,८१,८३ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, कॉपी राईट अॅक्ट, ट्रेडमार्क अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वर नमुद दोन्ही आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी दिनांक १७/०१/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मध्ये आहे.

Popular Articles