Home Latest News सामाजिक एकोप्याचा संदेश देणारी फकीरजी महाराजांची यात्रा

सामाजिक एकोप्याचा संदेश देणारी फकीरजी महाराजांची यात्रा

0

<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> जिल्हा म्हणजे वैविध्यपूर्ण यात्रांचा जिल्हा&period;प्रत्येक यात्रेने आपले वैशिष्ट्य जपले आहे&period;काही यात्रांना शेकडो वर्षांचा इतिहास आहे&period;आपल्या विविधतेतून समाजाला एकता आणि एकोप्याचा संदेश देणारी अशीच एक यात्रा यवतमाळ जिल्ह्यातील धनज माणिकवाडा या जुळ्या गावात गेली साडेतीनशे वर्षांपासून सुरू आहे&period;एका छोट्या नाल्याने विभाजित केलेले धनज आणि माणिकवाडा ही गावे&period; फकीरजी महाराजांच्या यात्रेचे जुळे गावं म्हणून ओळखले जाते&period; या गावामध्ये कार्तिक प्रतिपदा व आषाढी प्रतिपदेला हा यात्रा महोत्सव असतो&period; नेर &&num;8211&semi; बाभुळगाव रस्त्यावर आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या जुळ्या गावाने संपूर्ण विदर्भाला &comma;महाराष्ट्राला एकता&comma; एकोपा&comma;सहकारीता&comma; सहभागीत्व आणि धर्मनिरपेक्षतेचा मूलमंत्र दिला आहे&period;यावर्षी सहा नोव्हेंबरला कार्तिक प्रतिपदेला हा यात्रा महोत्सव होत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>350 वर्षांची परंपरा असणारी ही यात्रा पूर्वी या पंचक्रोशीसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या वार्षिक खरेदी विक्रीचा एक उत्सव म्हणूनही प्रसिद्ध होती&period; गृह उपयोगी व कृषी विषयक आवश्यक सर्व साहित्यांची&comma;अवजारांची खरेदी पूर्वीच्या काळात या यात्रेमध्ये व्हायची&period; सर्व धर्मीयांना एकत्रित आणणारी ही एक पारंपारिक उत्सव प्रक्रिया आहे&period;<img class&equals;"alignnone wp-image-19305 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;11&sol;WhatsAppImage2025-11-03at6&period;25&period;23PM1&lowbar;copy&lowbar;800x450&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"450" &sol;><&sol;p>&NewLine;<p>विदर्भातील संत परंपरा ही प्रामुख्याने प्रबोधनाकडे झुकलेली आहे&period;शक्ती&comma; भक्ती सोबतच विरक्ती व त्यातून समाजाचे भले ही या परंपरेची वैशिष्ट्य आहे&period; संत गाडगेबाबा यांचे सामाजिक सुधारणा&comma;शिक्षण&comma; आरोग्य&comma; स्वच्छता&comma;अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम&period;संत तुकडोजी महाराज यांचे ग्रामविकास&comma;कीर्तनातून सामाजिक प्रबोधन&comma; सामाजिक एकोप्याचे काम ज्या महापुरुषाने साडेतीनशे वर्षांपूर्वी सुरू केले होते&&num;8230&semi;त्या फकीरजी महाराजांच्या दरबारात नतमस्तक होण्यासाठी लाखोंची गर्दी दरवर्षी जमते&period;<&sol;p>&NewLine;<p>या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे भक्ती नामात निघणारी दिंडी&comma; या दिंडीमध्ये पारंपारिक वेशभूषेतील नागरिक&comma; भजनी पथक&comma;विविध धार्मिक देखावे &comma;श्रद्धा व्यक्त करण्यासाठी घातले जाणारे लोटांगण&comma;बाळ गोपाळांचा चित्ररथ&comma;मानाची पालखीचा सहभाग असतो&period; त्यानंतर होणारी विशाल दहीहंडी&comma; आणि एकत्रित सर्वांनी त्या दिवसाला कन्या भाकरीचा घेतलेला प्रसाद आहे&period; शेकडो डेगी मध्ये कन्या &lpar; ज्वारी पासून तयार होणारा खाद्य पदार्थ &rpar; तयार केल्या जातात&period;शिस्तीत लाखो लोकांना जेवण दिले जाते&period;<&sol;p>&NewLine;<p>ही यात्रा या पंचक्रोशीतील अनेक गावांमधील शिधा एकत्रित करून सहकाराच्या तत्त्वावर सहभागीत्वातून करण्यात येते&period; यात्रेपूर्वी एक महिना हा शिधा गोळा करण्यात येतो&period; यात्रेच्या दिवशी दोन्ही गावातील प्रत्येक नागरिक आपल्या घरून महाप्रसादासाठी आवश्यक असणारा शिधा अर्थात महाप्रसादाला लागणाऱ्या पिठापासून तर भाजीपर्यंतच्या साहित्याला घेऊन मंदिरात जातो&period;प्रत्येक गावकऱ्यांचे असे सहभागीत व या महाप्रसादात असते&period;फकीरजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी सामाजिक एकोप्याचा&comma;सहभागीत्वाचा गावगाडा निर्माण केला होता&period;हे जुळे गाव आजही हा गावगाडा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>किमान साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवकालीन संत म्हणून<&sol;p>&NewLine;<p>फकीरजी महाराज यांचे नाव आदराने घेतले जाते&period; फकीरजी महाराज कोण होते &quest; कुठून आले &quest; याबद्दल त्यांच्या भक्तांमध्ये अनेक प्रवाद आहेत&period; मात्र त्यांचा विदेही संत म्हणून सगळ्यांनी स्वीकार केला आहे&period; संत फकीरजी महाराज यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये सामाजिक एकोपा जपण्याची शिकवण दिली&comma; ग्रामविकासावर त्यांचा भर होता&comma;ते उत्तम पशुपालक आणि शेतीतज्ञ होते&period; ते उत्तम धन्वंतरी होते&period; ऐतिहासिक&comma; धार्मिक सर्वच महापुरुषांप्रमाणे त्यांनीही विदेही संतपरंपरेत त्या काळातील गावगाड्याच्या नियमानुसार गुराख्याचे काम केले&period; तत्कालीन गोपालक समुदायांमध्ये गोधन वाचविण्यापासून तर गुरांच्या गंभीर आजारावर ईलाज करणारे ते धन्वंतरी होते&period; ते उत्तम प्रवचनकार होते&period; त्यांच्या लेखी अमोघ वक्तृत्व होते&period; कर्मकांडापेक्षा कर्तुत्वाला त्यांनी आपल्या वागणुकीतून महत्व दिले&period; त्यांच्या पायरीवर आजही कुणी खोटे बोलत नाही&period; ते उत्तम शेती तज्ञही होते&period; पेरणीपूर्वी बी -बियाणे अर्पण करण्याची येथे परंपरा आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>याशिवाय या गावांमध्ये दर दिवाळीला गोधन फत्तेपूर बाबांच्या टेकडीवर चढवणे&comma; दर दोन वर्षांनी गावामध्ये साथ उत्सव साजरा करणे&comma;असे वार्षिक वेळापत्रक हे जुळे गाव वर्षानुवर्ष पाळत आले आहे&period; बदलत्या काळामध्ये कुस्त्यांची दंगल&comma; दरवर्षी होणारे वार्षिक कवी संमेलन अशा अनेक परंपरांना देखील पुढे नेण्याचा प्रयत्न गावातील तरुण करत आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>या यात्रा महोत्सवाचा सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्मीयांचा सहभाग&period; एका मुस्लिम सिकंदर फकिराने फकीरजी महाराजांचा सुरुवातीला सांभाळ केला&period; त्यामुळे फकीराच्या घरचा फकीर झाला&period; पुढे फकीरचा फकीरजी व नंतर श्री&period; फकीरजी महाराज असा हा या महाराजांचा जीवन प्रवास आहे&period; त्यामुळे सर्वच धर्मपंथांमध्ये त्यांचे अनुयायी असून या यात्रेच्या निमित्ताने दोन्ही गावातील व या पंचक्रोशीतील नागरिक यात्रेमध्ये सहभागी होतात&period;<&sol;p>&NewLine;<p>या मंदिराचे ट्रस्टी म्हणून विदर्भाचे ख्यातनाम कवी डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग सध्या ही कार्यरत आहे&period;सर्वधर्म समुदायाच्या ट्रस्टींकडून येथील कार्यभार चालविला जातो&period;राज्य शासनाने देखील या परंपरेची व वैशिष्ट्याची दखल घेऊन या ठिकाणच्या मंदिराला ब दर्जा दिला आहे&period; त्यामुळे या ठिकाणी अनेक विकास कामेही झाली आहेत&period;या पंचक्रोशीमध्ये अतिशय माफक दरात या ठिकाणचे मंगल कार्यालय गोरगरीब जनतेला उपलब्ध केले जाते&period;<&sol;p>&NewLine;<p>कधीकाळी या गावाच्या प्राचीनतेला दर्शविणारी भव्य दिव्य अशी गढी या गावाचे वैशिष्ट्य होते&period;या गावातील प्राचीन हेमाडपंथी मंदिर जमिनीत गाडलेले होते&period;या ठिकाणच्या दहा देवळांच्या भक्तांच्या समाधीचा समूह देखील श्रद्धेचा विषय आहे&period;या गावात कायम सांस्कृतिक&comma; क्रीडा व कलाविषयक कार्यक्रम सुरू असतात&period; त्यामुळे फकीरजी महाराजांच्या यात्रेला महाराष्ट्रातील सर्वदूर जिल्ह्यातून भाविक येत असतात&period;या वर्षी ६ नोव्हेंबरला ही यात्रा होत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>फकीरजी महाराज यात्रा महोत्सव<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>स्थळ &colon; धनज माणिकवाडा<&sol;p>&NewLine;<p>दिनांक &colon; ६ नोव्हेंबर २०२५<&sol;p>&NewLine;<p>काल्याचे किर्तन &colon; दुपारी १२ ते २<&sol;p>&NewLine;<p>महाप्रसादाची वेळ &colon; दुपारी १२ ते ८<&sol;p>&NewLine;<p>दहीहंडीची वेळ &colon; सायंकाळी ६ नंतर<&sol;p>&NewLine;<p>कवी संमेलनाची वेळ &colon; रात्री ८ वाजता<&sol;p>&NewLine;

Exit mobile version