Related Posts

कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

<p><strong>&&num;8211&semi; अल्प पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान&semi; दुष्काळी परिस्थितीत पाच हजारांची तुटपुंजी मदत नामधारी ठरत असल्याची शेतकऱ्यांची भावना<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; हातातोंडाशी आलेला घास हिरावला&semi; कर्जाचा डोंगर&comma; उत्पादन घट आणि आर्थिक विवंचनेत बळीराजा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>संदीप कांबळे&comma;कामठी &colon;- <&sol;strong>दिवाळी म्हणजे आनंदाचा&comma; प्रकाशाचा&comma; उत्साहाचा आणि नव्या आशेचा सण&excl; घराघरांत दिव्यांची रोषणाई&comma; फराळाचा सुगंध&comma; मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि कुटुंबीयांच्या भेटीगाठींनी वातावरण प्रसन्न होण्याचा हा काळ&period; मात्र&comma; कामठी तालुक्यातील अनेक शेतकरी कुटुंबांसाठी यंदाची दिवाळी आनंदाची नव्हे&comma; तर चिंता&comma; निराशा आणि आर्थिक विवंचनेची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत&period; आभाळाकडे आशेने पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी यंदा अपेक्षित पाऊस पडला नाही&period; अल्प पावसामुळे खरीप पिकांची वाढ खुंटली&comma; उत्पादनात मोठी घट झाली आणि शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले&period; त्यामुळे यंदा कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची वेदनादायी परिस्थिती निर्माण झाली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने शेतात पेरणी केली&period; बियाणे&comma; खते&comma; कीटकनाशके&comma; मशागत&comma; मजुरी आणि इतर शेती खर्चासाठी अनेकांनी कर्जाचा आधार घेतला&period; चांगला पाऊस पडेल&comma; पीक बहरून येईल आणि यंदा कर्जाचा काही भाग फेडता येईल&comma; अशी अपेक्षा प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात होती&period;मात्र&comma; पावसाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले&period; पावसाच्या अभावामुळे सोयाबीन&comma; धान &comma;कपाशी आणि इतर खरीप पिकांची वाढ खुंटली&period; काही ठिकाणी पिकांची स्थिती अत्यंत खराब झाली&comma; तर अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे&period; शेतात दिवसभर राबून&comma; घाम गाळून आणि खर्च करूनही हातात अपेक्षित उत्पन्न येणार नसल्याने बळीराजा हताश झाला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून जाहीर करण्यात आलेली पाच हजार रुपयांची तुटपुंजी मदत शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष दिलासा ठरण्याऐवजी नामधारी मदत ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे&period; शेतीच्या संपूर्ण हंगामासाठी हजारो रुपये खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तुलनेत पाच हजार रुपयांची मदत अत्यंत अपुरी असल्याचे चित्र आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>बियाणे&comma; खते&comma; कीटकनाशके&comma; मजुरी आणि मशागतीसाठी झालेला खर्च पाहता&comma; ही रक्कम शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटावर कितपत उपाय ठरू शकते&comma; असा सवाल उपस्थित होत आहे&period; एकीकडे पिकांचे नुकसान&comma; दुसरीकडे कर्जाचे हप्ते आणि तिसरीकडे कुटुंबाच्या दैनंदिन गरजा अशा तिहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मदत केवळ औपचारिकता ठरत असल्याची नाराजी आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>शेतकऱ्यांना केवळ घोषणांची नव्हे&comma; तर त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात ठोस आर्थिक मदतीची गरज आहे&period; नुकसानभरपाईच्या नावाखाली मिळणारी तुटपुंजी रक्कम आणि प्रत्यक्ष शेतीतील नुकसान यामधील मोठी तफावत दूर करण्याची मागणी आता जोर धरत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दिवाळीच्या दिवसांत प्रत्येक घरात आनंदाची तयारी सुरू असते&period; मुलांना नवीन कपडे घ्यायचे असतात&comma; घरात फराळ करायचा असतो&comma; दिवे लावायचे असतात आणि सण आनंदाने साजरा करायचा असतो&period; परंतु&comma; यंदा कामठी तालुक्यातील अनेक शेतकरी कुटुंबांसमोर या साध्या अपेक्षा पूर्ण करण्याचेही आव्हान उभे राहिले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>शेतात पीक उभे असताना त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर वर्षभराचे आर्थिक नियोजन केले जाते&period; शेतीतून मिळणाऱ्या पैशांतून कर्जफेड&comma; मुलांचे शिक्षण&comma; घरखर्च&comma; आरोग्यविषयक गरजा आणि सणासुदीचा खर्च भागवला जातो&period; मात्र&comma; यंदा उत्पादन घटल्याने या सर्व गरजांवर संकटाचे सावट निर्माण झाले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>घरातील मुलांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद पाहण्याची इच्छा असलेल्या शेतकरी पालकांच्या मनात मात्र खर्चाची चिंता आहे&period; मुलांच्या कपड्यांसाठी&comma; फराळासाठी आणि घरातील आवश्यक वस्तूंसाठी पैसे कुठून आणायचे&comma; हा प्रश्न त्यांना सतावत आहे&period; शेतात राबूनही घरात आनंद आणता येत नसल्याची वेदना बळीराजाच्या मनाला बोचत आहे&period;दुष्काळी परिस्थिती जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा होती&period; मात्र&comma; प्रत्यक्षात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किती आणि केव्हा मदत मिळणार&comma; याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत&period; पीक नुकसान&comma; कर्जबाजारीपणा आणि वाढता शेती खर्च यामुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या खोल गर्तेत जात असल्याचे चित्र आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>शासनाने तातडीने पीक नुकसानीचे सर्वंकष पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी&period; पीक विम्याची रक्कम वेळेत मिळावी&comma; दुष्काळी सवलतींचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा&comma; &period;शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून संपूर्ण समाजाच्या जीवनाचा आधार आहे&period; त्याच्या शेतात पीक बहरले तर बाजारपेठेत समृद्धी येते आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते&period; मात्र&comma; तोच शेतकरी संकटात असताना त्याच्या वेदनांकडे दुर्लक्ष होणे ही चिंतेची बाब आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाची दिवाळी केवळ सण नसून त्यांच्या आर्थिक परिस्थितीची कसोटी ठरणार आहे&period; निसर्गाच्या अवकृपेने हिरावलेले उत्पन्न&comma; कर्जाचा वाढता भार आणि अपुऱ्या मदतीमुळे निर्माण झालेली निराशा यामध्ये बळीराजा अडकला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दिवाळीच्या दिव्यांनी घराघरांत प्रकाश पसरवला जाईल&semi; मात्र शेतकऱ्यांच्या आयुष्यातील आर्थिक अंधार दूर करण्यासाठी शासनाने ठोस मदतीचा दिवा पेटविणे आवश्यक आहे&period; पाच हजारांच्या नामधारी मदतीऐवजी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीची भरपाई आणि आर्थिक पुनर्वसनाची गरज आहे&period; अन्यथा&comma; यंदाच्या दिवाळीत बळीराजाच्या घरात दिवे तर लागतील&comma; पण मनातील चिंता आणि निराशेचा अंधार कायम राहण्याची भीती आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसणार कोण&quest; आणि बळीराजाच्या घरात खऱ्या अर्थाने आनंदाची दिवाळी आणणार कधी&quest; हा प्रश्न आज कामठी तालुक्यातील शेतकरी शासनाच्या दरबारात उपस्थित करीत आहेत&period;<&sol;p>&NewLine;