spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ट्रकचालक व साथीदारांकडुन तरुणावर चाकुने जीवघेणा हल्ला

– कन्हान पोस्टे ला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

कन्हान :- तारसा रोड कन्हान येछील गॅलेक्सी बार समोर किरकोळ वादातुन एका तरुणावर चाकुने जीव घेणा हल्ला करण्यात आल्याची घटना रविवारी (दि.२) ऑगस्ट ला रात्रीस घडली. या हल्ल्यात निलेश लोंढे हा गंभीर जख्मी झाला असुन कन्हान पोलिसांनी तिघां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी वीरू बिरजु हातागडे वय २३ वर्ष, रा. वाघधरे वाडी, एमजी नगर, कन्हान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते व त्यांचा मित्र निलेश उर्फ नितेश मुलचंद लोंढे वय २७ वर्ष, रा. सत्रापुर कन्हान मोटार सायकलने कन्हान कडे येत असताना रात्री ९.३० ते ९.४५ वाजता दरम्यान तारसा रोडवरील गॅलेक्सी बार समोर एक ट्रक आडवा उभा असल्याने वाद झाला. यावेळी ट्रक चालक अश्विन उर्फ गुड्डू वाघमारे याने शिवीगाळ केली. त्यानंतर त्याचे साथीदार अभी सोमकुंवर व सम्यक परिपगार घटनास्थळी आले. वाद वाढल्यानंतर सम्यक परिपगार याने हातातील धारदार चाकुने निलेश लोंढे यांच्या पोटात वार करून गंभीर जख्मी केले. त्यानंतर अश्विन उर्फ गुड्डू याने तोच चाकु सम्यक च्या हाता तुन घेऊन निलेशच्या पाठीमागे कमरेवरही वार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जख्मी निलेश लोंढे याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, कन्हान येथे उपचारासाठी हलविण्यात आले. फिर्यादी च्या तक्रारीवरून कन्हान पोस्टे ला अश्विन उर्फ गुड्डू वाघमारे, अभी सोमकुंवर आणि सम्यक परिपगार यांच्या विरुद्ध कलम ११८(२), २९६, ३(५) भा. न्या.स अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.

Popular Articles