spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कन्हान येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी

– अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर ; समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

कन्हान :- जय लहुजी शक्ती संघटना कन्हान यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजन करून महापुरुषांना अभिवादन, भव्य मिरवणुक, प्रबोधनपर मार्गदर्शन आणि स्नेहभोजन अशा विविध उपक्रमांद्वारे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख नगरपरिषद कन्हान-पिपरी नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे, उपाध्यक्ष रिकेंश चवरे, लाहनु इंगले, अमित वाघमारे, लक्की ठाकुर, दुर्गेश बावने, विनायक इंगोले यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तदंतर धरमनगर येथुन भव्य मिरवणुक काढुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातुन महामार्गाने तारसा रोड चौक, नाका नं.७, संताजी नगर कांद्री येथे पोहोचुन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मिरवणुक शहरातील मार्गाने भ्रमण करित प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान परिसरात समारोपीय कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनकार्य, साहित्य आणि सामाजिक योगदानावर मार्गदर्शन करित त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सांगता स्नेह भोजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश बावने यांनी तर आभार प्रदर्शन देवेंद्र इंगोले यांनी केले. यावेळी साधना बावने, छाया वानखेडे, पंचा इंगले, पायल गवली, भारती वानखेडे, आरती वानखेडे, गौरी वानखेडे, ज्योती वानखेडे,रविना इंगोले, शुभांगी इंगोले, कविता चौहान सह मोठ्या संख्येने समाजबांधव व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मनोहर इंगले, देवेंद्र इंगोले, राकेश बावने, संजय वानखेडे, विलास खडसे, रंजेश वानखेडे, धीरज इंगोले, राधेश्याम डोंगरे, प्रवीण चौहान, अमोल गवली, मनोहर गवली, राहुल वानखेडे, आशीष वानखेडे, साहिल बावने आदींनी विशेष परिश्रम घेतले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.