spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विद्युतचा धक्का लागून‌ वडीलासह मुलाचा मृत्यू

– तिरोडा येथील हदयदायक घटना*

गोंदिया :- जिल्ह्यातील तिरोडा स्थानिक संत रविदास वॉर्डमध्ये सोमवारी संध्याकाळी विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वडीलासह मुलाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना 22 सप्टेंबर सोमवार सायंकाळच्या दरम्यान घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नरेश बरियकर वय वर्ष (५५) हे आपले ई-रिक्षा चार्ज करत होते. या घटनेदरम्यान, शेड आणि शटरमधून विद्युत तारेतून विद्युत प्रवाह गेला. नरेश बरियेकर यांना चुकून शटरला स्पर्श झाल्याने विद्युत प्रवाह धक्का लागला.

वडिलांना वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा दुर्गेश नरेश बरियेकर वय (२२) वर्ष वाचविण्यासाठी धावला असता तो देखील विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने वडील व मुलगा या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटनेची माहिती

कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली .तिरोडा पोलिस देखील घटनास्थळी पोहोचून पंचनामा तयार करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठविले घटनेचा अधिक तपास तिरोडा पोलीस करीत आहेत.

फाईल फोटो


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.