तिरोडा :- राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी येथील विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय भूमिका अभिनय स्पर्धा व लोकनृत्य स्पर्धेत भाग घेतला होता. यात दोन्ही स्पर्धेत शाळेच्या चमूने उत्कृष्ट सादरीकरण करत भूमिका अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून शाळेची चमू जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली तसेच लोकनृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
मेंढे मुख्याध्यापक ,शिक्षिका घरडे , शिक्षक कौंडलकर तसेच सर्व शिक्षकवृंदांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हे यश विद्यार्थिनींना मिळाले. विजेत्यांचे मनःपूर्वक आभार करित पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.




