– निलज येथे जिओची मोबाईल सेवा सुरळीत
किशोर साहू, मौदा :- मौदा तालुक्यातील सीमेलगत असलेल्या व पारशिवनी तालुका अंतर्गत येत असलेल्या निलज येथील जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या रेंज मशीन व महागड्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने जिओची मोबाईल सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे जिओचे मोबाईलधारक ग्राहक कमालीचे त्रस्त होते. याबाबत निलज येथील शिवसेना (उबाठा) चे सहसंपर्कप्रमुख रवींद्र चकोले, सामाजिक कार्यकर्ते भास्कर चकोले यांनी हिंदी, मराठी दैनिक, सायं दैनिक, वेब पोर्टलच्या माध्यमातून जिओ टावर च्या चोरी गेलेल्या महागड्या बॅटऱ्या व रेंज मशीन लवकरात लवकर बसवून जिओ मोबाईल धारक नागरिकांना दिलासा देण्याची मागणी संबंधित वरिष्ठ अधिकारी व प्रशासन विभागाकडे केली होती. अखेर त्यांच्या या मागणीची जिओच्या संबंधित विभागाने तात्काळ दखल घेत चोरी गेलेल्या महागड्या बॅटऱ्या व रेंज मशीन टावर मध्ये नवीन लावून जिओच्या मोबाईल टावर सुरळीत केले.




