spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

घरासमोर उभी असलेल्या वाहनांत लागली आग; सुदैवाने मोठी दुघर्टना टळली, खापा येथील घटना, उभी कार जळुन खाक, वाहनात घरगुती गॅस भरत असल्याची परिसरात चर्चा 

खापा :- घरासमोर उभी असलेली ओमनी कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना गुरूवार (ता. ४ डिसेंबर) ला दुपारच्या सुमारास खापा नगर परिषद जवळ घडली.

खापा शहरात नगर परिषद कार्यालयाच्या बाजुला घरा समोरील रस्त्यावर एक ओमनी कार उभी होती. अचानक या कारने पेट घेतला. बघता बघता आगीने उग्ररूप धारण करत गाडी जळून राख झाली. कार पेट घेत असतांना परिसरातील नागरिक हादरून गेले होते. आगीने आजुबाजुचा परिसर आपल्या कवेत घेतला नसल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही.

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

खापा नगर पालीकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन गाडी घटनास्थळी पोहचेपर्यंत गाडी जळुन खाक झाली होती. स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही. ही शॉर्टसर्कीटमुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पण ही आग नेमकी कशाने लागली, याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. पण वाहनात घरगुती गॅस भरत असताना, ही घटना घडल्याची परिसरात नागरिकांमध्ये चर्चा आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.