Home Latest News पहिले अपारंपरिक ऊर्जा अनुभव केंद्र नागपूरात

पहिले अपारंपरिक ऊर्जा अनुभव केंद्र नागपूरात

0

<p><strong>नागपूर &colon;<&sol;strong> पारंपरिक इंधनस्रोत कमी होत चालले आहेत&period; अपारंपरिक ऊर्जेची गरज मोठ्या प्रमाणात वाढत आहे&period; त्यामुळे घरगुती व औद्योगिक पातळीवर सौर ऊर्जा वापरण्याकडे कल दिसून येत आहे&period; या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जा क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या वापराचा प्रत्यक्ष अनुभव देणारे अपारंपरिक ऊर्जा अनुभव केंद्र नागपुरात उभारण्यात आले आहे&period; अशाप्रकारचे हे मध्य भारतातील पहिले केंद्र असल्याचे ग्रीन लाईफ सोल्युशनच्या संचालक नेहा देवतळे यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>बाजारात आता सौर ऊर्जेवर चालणारी अनेक उपकरणे उपलब्ध झाली आहेत&period; यामध्ये सोलर कुलर&comma; सोलर गिझर&comma; सोलर पंखे आणि कृषी पंपांचा समावेश आहे&period; विशेषतः ग्रामीण भागात&comma; जिथे नियमित वीजपुरवठा अडचणीचा आहे&comma; तेथे सौरऊर्जेवर चालणाऱ्या कृषी पंपांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे&period; सरकारदेखील सौरऊर्जेचा प्रचार करत असून अनुदान आणि योजनांद्वारे नागरिकांना सौर उपकरणे बसवण्यास प्रोत्साहन देत आहे&period; दीर्घकालीनदृष्ट्या ही गुंतवणूक फायदेशीर ठरत असून पर्यावरणपूरकही आहे&period; सौरऊर्जेचा वापर वाढल्याने वीजबिलात बचत&comma; स्वयंपूर्णता आणि हरित ऊर्जा वापराचे ध्येय साध्य होत आहे&period; भविष्यात सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर आणखी वाढण्याची शक्यता आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>पण&comma; या क्षेत्रात होणारे संशोधन&comma; नवीन उपकरणे यांचा वापर हा कुतूहलाचा विषय असतो&period; ही बाब लक्षात घेऊन ग्रीन लाईफ सोल्युशन्स प्रा&period; लि&period; ने विविध अक्षय ऊर्जा उत्पादन अनुभव केंद्र सुरू केले आहेत&period; या केंद्राचा उद्देश लोकांना अक्षय ऊर्जेच्या विविध स्रोतांची आणि तंत्रज्ञानाची माहिती देणे आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>हे केंद्र लोकांना सौर ऊर्जा&comma; पवन ऊर्जा&comma; बायोमास&comma; हायड्रोजन आणि ई-वाहन या अक्षय ऊर्जा स्रोतांबद्दल माहिती तसेच उपकरणाची ओळख करून देईल&period; अभ्यागतांना सौर पॅनेल&comma; पवनचक्की आणि इतर आधुनिक उपकरणांची प्रत्यक्ष ओळख मिळेल&period; हे केंद्र भविष्यात अक्षय ऊर्जा क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी एक प्रशिक्षण केंद्र म्हणूनही काम करेल&period;<br &sol;>&NewLine;या अनुभव केंद्राच्या माध्यमातून आम्ही लोकांना अक्षय ऊर्जेचे फायदे समजावून देऊ आणि त्यांना या क्षेत्रात सक्रिय होण्यासाठी प्रोत्साहित करू&period; त्याचाच एक भाग म्हणूल होयमाइल्सचा &OpenCurlyQuote;सोलर देश यात्रा ट्रक रोडशो’ नागपूर &lpar;एमआयडीसी हिंगणा&rpar; येथून मंगळवारी सुरू झाला&period; या &OpenCurlyQuote;रोड शो’चे उद्दिष्ट देशभर सौर ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करणे व &OpenCurlyQuote;होयमाइल्स’ची अत्याधुनिक उत्पादने सर्वसामान्यांपर्यंत तसेच उद्योग-व्यवसायांपर्यंत पोहोचवणे हा आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>होयमाइल्स’ हा जगातील दुसरा सर्वात मोठा &OpenCurlyQuote;मायक्रोइन्व्हर्टर’ पुरवठादार आहे&period; कंपनीकडे ३०६ पेक्षा जास्त जागतिक पेटंट्स आहेत&comma; अशी माहिती नेहा देवतळे यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; lokstta<&sol;p>&NewLine;

Exit mobile version