spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कोदामेंढी येथे विविध ठिकाणी ध्वजारोहण

किशोर साहू, मौदा :- कोदामेंढी येथे विविध शासकीय व खाजगी कार्यालय , शाळा,संस्थांमध्ये ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच आशिष बावनकुळे यांच्या हस्ते, जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य सुरेश ढोके यांच्या हस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर हरणे यांच्या हस्ते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक मानकर यांच्या हस्ते, राजेश्वरी रेड्डी स्कॉलर कॉन्व्हेंट येथे संचालक सत्यनारायण रेड्डी यांच्या हस्ते, दयाराम भोयर पब्लिक स्कूल येथे प्रतिष्ठित नागरिक रामबाबू देवनेनी यांच्या हस्ते, साईबाबा पतसंस्थेत संस्थेचे संचालक तथा भावी अध्यक्ष श्याम देवतळे यांच्या हस्ते, बाजार चौक येथे माजी सरपंच उमाकांत देवतळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. इतरही ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी भाजपा तालुका मौदा मंडळ अध्यक्ष भगवान बावनकुळे, माजी उपसभापती अशोक हटवार, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष विवेक देवतळे, उपसरपंच गोपाल गिरमेकर, ग्रामपंचायत सदस्यगण विष्णू बावनकुळे, खुशाल शिवणकर, रवी ठवकर, सदानंद मेश्राम, अनिता हटवार, कोमल खडसे, स्वाती गौरखेडे, रूपाली ठाकरे, अंजली मोहूर्ले, हेमलता देवतळे सह शाळेतील सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles