spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गाळपेरा करून चारा लागवड करावी

 मृद व जलसंधारण विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

यवतमाळ :- जिल्ह्यात भविष्यात उद्भवू शकणाऱ्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता, जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना विभागाच्या अधिपत्याखालील सर्व धरणांच्या जलाशय क्षेत्रात पाणी कमी झाल्यामुळे उपलब्ध झालेल्या जमिनीवर गाळपेरा करून चारा पिकांची लागवड करण्याचे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या वतीने करण्यात आले आहे.

धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाल्यानंतर जलाशयाच्या पाण्याखालील भागातील सुपीक गाळमिश्रित जमीन उपलब्ध होते. अशा जमिनीचा योग्य वापर करून शेतकरी बांधवांनी चारा पिकांची लागवड केल्यास जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच संभाव्य दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संगोपन करणे सुलभ होऊन चारा टंचाईची तीव्रता कमी करण्यास हातभार लागेल.

त्याअनुषंगाने मृद व जलसंधारण विभाग, यवतमाळ विभागाच्या अधिपत्याखालील सर्व धरणांमध्ये उपलब्ध होणाऱ्या गाळपेरा क्षेत्राचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा. विशेषतः मका, ज्वारी, बाजरी, चारा पिके तसेच पशुधनासाठी उपयुक्त असलेल्या इतर हिरव्या चारा पिकांची लागवड करण्यास प्राधान्य द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

शेतकरी बांधवांनी गाळपेरा करण्यापूर्वी संबंधित धरणाचे क्षेत्र, उपलब्ध जमीन, पाणीसाठ्याची स्थिती व आवश्यक परवानगी बाबत मा. कार्यकारी अभियंता मृद व जलसंधारण विभाग अथवा उप अभियंता मृद व जलसंधारण उपविभाग यांचे कार्यालयात अर्ज करावा. धरणाच्या सुरक्षिततेस बाधा येणार नाही तसेच जलाशयाच्या वापरावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेऊनच गाळपेरा करावा, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

Popular Articles