spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रामनगर पोलीस स्टेशन येथे प्रथमच गणपती बाप्पा विराजमान

गोंदिया २८ :- पोलिसांच्या गाडीच्या सायरनसह ढोल ताशाच्या गजरात ब गोंदिया शहरातील  रामनगर पोलिस ठाण्यात बाप्पाचे आगमन करण्यात आले. यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड  सहभागी झाले होते.पहिलाच वर्षी गणपती बाप्पा पोलीस स्टेशनमध्ये विराजमान करण्यात आले.आज संपूर्ण महाराष्ट्रसह देशभरात गणपती बाप्पाचे आगमन होत आहे .अशातच घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणपती सुद्धा आज विराजमान झाले असून त्यांची प्राणप्रतिष्ठान करण्यात येत आहे.अशातच गोंदिया शहरातील रामनगर पोलीस स्टेशन येथे पहिल्यांदाच गणपती बाप्पा विराजमान झाले पूजा अर्चना करून त्यांची स्थापना करण्यात आली. यावेळी गणपती बाप्पाला पोलिसांच्या गाडीच्या सायरनसह ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. या वेळी पोलीस अधिकारी व कर्मचारीसह होमगार्ड हे देखील या वेळी मोठ्या संख्याने उपस्थित होते. रामनगर पोलिस ठाण्यातील दिपक देशमुख API यांनी सांगितले आहे कि प्रथमताच  गणपती बाप्पा पोलिस ठाण्यात विराजमान करण्यात आले असुन येथील कर्मचारी सुख समृद्धी बाप्पा देवो हिच मागणी बाप्पा व सर्व भाविकांना गणेशोत्सव शुभेच्छा देखील यावेळी त्यांनी दिल्या

Popular Articles