spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांचा विधी विद्यार्थ्यांसोबत मनमोकळा संवाद

– विद्यार्थ्यांना केले प्रेरणादायी मार्गदर्शन

यवतमाळ :- भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या उपस्थितीत अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ येथे ‘स्वतंत्रता सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ’ यांच्या वतीने ‘कायदा आणि न्यायशास्त्र’ या विषयावर विशेष संवाद कार्यक्रम रविवारी पार पडला. यावेळी न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी विधी विद्यार्थ्यांयोबत मनमोकळा संवाद साधला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा लोकमतचे चेअरमन डॉ. विजय दर्डा होते. यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद यावलकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री, मंडळाचे सचिव सीए प्रकाश चोपडा, उपाध्यक्ष डॉ. ललित निमोदिया, अॅड. प्रवीण जानी, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजेश मुनोत, अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय लाड आदी उपस्थित होते.

माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांना विधी विद्यार्थ्यांयोबत संवाद साधतांना कायद्याच्या क्षेत्रात नैतिकतेचे महत्व विषद केले. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच त्यांच्या कारकिर्दीत त्यांना आलेल्या अनुभवांची माहिती विधी विद्यार्थ्यांना देवून प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपूरमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, अशी सूचना लोकमतचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी यावेळी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन योगिता बोरा यांनी तर आभार सीए प्रकाश चोपड़ा यांनी मानले.

Popular Articles