spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

श्री संत गजानन महाराजांची कोराडी पायी दिंडी यात्रा उत्साहात संपन्न

– २६ व्या वर्षी पालखीचे कोराडी माता जगदंबा मंदिरात भव्य स्वागत; भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांचा सहभाग

नागपूर :- श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्ट, निर्मल नगरी नागपूर यांच्या वतीने आयोजित नागपूर ते कोराडी पायी दिंडी सोहळ्याचे यंदा २६ वे वर्ष मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरे करण्यात आले. रविवारी १५ नोव्हेंबर रोजी, श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे कोराडी येथील प्रसिद्ध माता श्री जगदंबा मंदिर परिसरात भव्य आगमन झाले. यावेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने पालखीचे स्वागत केले.

श्रींच्या नामघोषात, टाळ- मृदंगाच्या गजरात आणि भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या या दिंडी सोहळ्याने संपूर्ण परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. दिंडीमध्ये विविध गावांतील वारकरी, भाविक आणि भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात भगव्या पताका घेऊन सहभागी झालेल्या पताकाधारी वारकऱ्यांनी दिंडीची शोभा वाढवली. या दिंडी सोहळ्यात डोमक, लाडकी आणि चांदूर बाजार येथील पताकाधारी वारकऱ्यांनी विशेष सहभाग नोंदविला. तसेच कोराडी दिंडीतील टाळकरी आणि मृदंगाचार्यांच्या पथकाने आपल्या वादनातून भक्तिमय वातावरण अधिकच रंगतदार केले.

टाळ- मृदंगाचा निनाद, हरिनामाचा गजर आणि श्री संत गजानन महाराजांच्या जयघोषाने दिंडी मार्ग भक्तिरसाने भारावून गेला. श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे कोराडी येथे आगमन होताच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. श्रद्धा, भक्ती, एकात्मता आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम या पायी दिंडी सोहळ्यात अनुभवायला मिळाला.

गेल्या २६ वर्षांपासून सुरू असलेली ही पायी दिंडी परंपरा भक्तांच्या श्रद्धेचे आणि संत गजानन महाराजांवरील निस्सीम भक्तिभावाचे प्रतीक ठरत आहे. यंदाही मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या दिंडी सोहळ्याने नागपूर आणि कोराडी परिसरातील भाविकांमध्ये भक्तिमय आनंदाचे वातावरण निर्माण केले. कोराडी जगदंबा मातेच्या मंदिरात तीन हजार भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली करण्यात आली होती. सगळ्या भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी गजानन भक्तांनी अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी नागपूर- कोराडी पायी दिंडी यात्रेत सहभागी होणारे लाडकी-पताका धारी, कुणाल महाराज फुलझेले-टाळकरी टीम, गायक टीम, मृदुंगाचाऱ्य, साऊंड सिस्टीम, फुल सजावट, ह भ प कृणाल महाराज फुलझेले व संच, श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ मंडळ हुडकेश्वर रोड,चोपदार, सुरक्षा रक्षक, सेवेकरी मुले, मंदिरातील सेवेकरी, रस्त्यातील चहा, पाणी, अल्पोहार व्यवस्था करणारे निर्मल नगरी मंदिर, सिरसपेठ बांगडे, भुते, कॉटन मार्केट, ताजुदिन बाबा दर्गा, झिंगाबाई टाकळी काळे परिवार, लोलगे परिवार, मानकापूर – गोपाल राऊत व मित्र परिवार, इतर सेवा देणारे चांदेकर, वैरागडे, इतर सर्व सेवेकरी, माऊली भक्तगण, नरेंद्र झोड, श्री महालक्ष्मी जगदंबा माता संस्थान कोराडी येथील विश्वस्त मंडळ दिंडी सोहळा साजरा करण्याकरिता ज्या माऊली श्री भक्तांनी आपली सेवा समर्पित केली त्या सर्व मंडळीचे खुप खुप धन्यवाद दिले.

Popular Articles