spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

माजी आमदार सुधीर पारवे यांचा कुही तालुक्यात पिक पाहणी दौरा

साळवा :- कुही तालुक्यातील चार जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत तितूर, नवरगाव, चापेगडी,राजोला,वेलतूर, बोथली, मांढळ, रुयाड येथिल अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन नुकसान झालेल्या शेती पिकांची व घरांची माजी आमदार तथा तालुका समन्वय समिती अध्यक्ष सुधीर पारवे यांनी तहसीलदार डॉ.अमित घाडगे, खंड विकास अधिकारी डॉ.स्वप्निल मेश्राम, तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे यांच्या संमेत पाहणी केली.

यात सलग झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर उभ्या पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहे,शेती पिकांचे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करून घ्यावेत.तसेच शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्वरीत कारवाई करूनशासनाने ज्या निकषांनुसार मदत देणे अपेक्षित आहे ते निकष शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

अशा सुचना यावेळी पारवे. यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या शेतकरी हे आपल्या राष्ट्राचे कणखर आधारस्तंभ आहेत. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस साहेब, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्य कृषी मंत्री आशिष जयस्वाल जी हे नागपूर जिल्ह्यातील असल्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभी असुन त्यांना ठाम पने मदत करेल असा विश्वास त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलतानी व्यक्त केला.

यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष डॉ. शिवाजी सोनसरे, पंचायत समिती उपसभापती ईस्तारी तळेकर, पंचायत समिती उपसभापती वामन श्रीरामे, सौरभ दंडारे, गजानन धांडे, हुकूम लांबाडे, ईश्वर भारती, अतुल सोनसरे,राहुल भोयर, रुपाली, ग्यानीवंत साखरवाडे, अनिल कुकुडकर डॉ.विनोद जुवार, तुकाराम शिवणकर, सुनिल किंद्रले, संजू निरगुरकर, संदीप सुखदेवे, राजेश तिवस्कर, स्वप्नील राऊत,धनपाल लोहारे यांच्या सह तालुक्यातील ग्रामसेवक, साहाय्यक कृषी अधिकारी, तलाठी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles