नागपूर :- थोर भारतीय शास्त्रज्ञ, क्षेपणास्त्रांचे प्रणेते, भारतरत्न आणि भारताचे माजी राष्ट्रपती. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.
आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन अपर आयुक्त तेजुसिंह पवार यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.




