spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चाचेर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महागडी सेवा होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आपल्या आरोग्य समस्यांवर उपचार करून घेणे परवडत नाही. यासाठी सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करने गरजेचे आहे. त्यामुळे आजारपणाचे निदान होऊन डॉक्टरांना उपचार करणे शक्य होते. सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासविण्याचे काम डॉ. प्रदीप बोरकर व डॉ. वैशाली बोरकर संचालक रिआन हॉस्पिटल यांच्या सहकार्यातून चाचेर येथे रिआन पॅथॉलॉजी लॅबचे उद्घाटन करण्यात आले असून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. आरोग्य तपासणी शिबिरात रुग्णांची सामान्य, बालरोग, स्त्रीरोग, हृदयरोग, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर , नेत्र तपासणी करण्यात आली. शिबिरात हॉस्पिटल तर्फे डॉ. प्रदीप बोरकर, डॉ. वैशाली बोरकर, डॉ. मुक्ता गोंदुळे, डॉ. असंग वासनिक, डॉ. सुनील आसटकर, विपीन बनसोड, संजीवनी आय केअरचे प्रशांत उराडे, हिमानी घोडाकडे, स्मिता बाविस्कर यांनी सेवा दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डाँ. प्रदीप बोरकर आणि डॉ. वैशाली बोरकर यांच्या उपस्थितीत सरपंच लुंबिनी कलारे यांच्या हस्ते लॅबचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला आकाशझेपचे सचिव साक्षोधन कडबे, ग्रामपंचायत सदस्य सुमन सोमकुवर, वासुदेव सोमकुवर, प्रभाकर दरवई, आरती दौलतानी, कुणाल गजभिये आणि कशीश गजभिये उपस्थित होते.

Popular Articles